परभणी/गंगाखेड(Parbhani):- पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सध्या सुरू असलेली पोलीस भरती मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी दि. २१ जून रोजी गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना सादर केलेल्या निवेदनात पोलीस भरतीची (Police recruitment) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
उमेदवारांच्या मैदानी चाचणी करिता इच्छीत स्थळी पोहचणे अत्यंत जिकरीचे झाले आहे
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे गृह मंत्रालयाच्या(Ministry of Home Affairs) अखत्यारितीत संबंध जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस भरतीव्या मैदानी चावणीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु सध्या राज्यभर पावसाळी हवामान असल्या कारणाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मैदानी चाचणी करिता इच्छीत स्थळी पोहचणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. अशा हवामानात(weather) प्रवास केल्याने उमेदवारांच्या आरोग्यावर विपरित परिणाम उमेदवारांच्या मैदानी चाचणीवर होत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करून पावसाळा संपल्या नंतर सर्व उमेदवारांना आवश्यक अशा वातावरणात पोलीस भारती मैदानी चाचणी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती निवेदनात करून पोलीस भरती मैदानी चाचणी पावसाळा संपल्यावर आयोजीत करावी अशी मागणी पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, परभणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पाठविण्यात आल्या असून निवेदनावर असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.