हिंगोली जिल्हा पोलीस दलाची भरती प्रक्रिया
हिंगोली (Police Recruitment) : जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त जांगासाठी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर ११ फेब्रुवारी पासुन भरती प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. मध्यतंरी औंढा नागनाथ महाशिवरात्री यात्रेनिमित्त तिन दिवस भरती प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. १७ फेब्रुवारीला एक दिवस भरती प्रक्रिया राबविण्यात आली.बोलावलेल्या १०९० पैकी ६०७ उमेदवार उपस्थित होते.
आता आज १८ फेब्रुवारीला औंढा नागनाथ येथील रथोत्सव व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सर्वत्र चोख (Police Recruitment) पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. त्यामुळे २० फेब्रुवारीपर्यंत भरती प्रक्रिया बंद ठेवली जाणार. २१ फेब्रुवारीपासुन ही भरती प्रक्रिया पुर्ववत सुरू होणार आहे.




