हिंगोली (Hingoli cricket match) : पोलीस व पत्रकार संघामध्ये रविवारी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत पोलीस संघाने षटकार खेचत विजय मिळवित पत्रकार संघावर मात केली. विशेष म्हणजे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहा निरीक्षक शहाजी उमाप यांनी संयमी फलंदाजी करीत अर्धशतक झळकावत संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला.
नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी साठी मागील सहा दिवसापासून तळ ठोकून आहेत. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेनुसार पत्रकार आणि पोलीस यांच्यात मैत्री पूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले.
येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर रविवारी 5 जानेवारीला सकाळी (Hingoli cricket match) पोलीस आणि पत्रकार यांच्यातील मैत्रीपूर्ण लढतीत प्रारंभी शहाजी उमाप यांच्या हस्ते टॉस करण्यात आला. यावेळी पत्रकार संघांचे कर्णधार दिलीप हळदे यांनी टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निर्धारित 14 षटकात पत्रकार संघांनी दहा गडी गमावत 91 धावसंख्या उभारली आणि पोलीस संघाला 92 धावांचे उद्दिष्ट देण्यात आले. पत्रकार संघाकडून कर्णधार दिलीप हाळदे यांनी बारा धावा केल्या, तर गोलंदाजी मध्ये सुमित कान्हेड, प्रसाद आर्वीकर, विजय पाटील यांनी पत्रकार संघाकडून उत्कृष्ठ गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
दरम्यान, 92 धावांचे लक्ष समोर ठेऊन मैदानात फलंदाजीसाठी उतरलेले (Hingoli cricket match) पोलीस संघांचे कर्णधार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना पत्रकार संघाच्या गोलंदाजानी जखडून ठेवले होते.दुसऱ्या षटकात प्रसाद यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा त्रिफळा उडविला होता मात्र तो नोबाल असल्याने कोकाटे यांना जीवनदान मिळाले.
मात्र तिसऱ्याच षटकात कोकाटे यांनी किपर करवी झेल बाद झाले. त्यानंतर आलेल्या जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी जोरदार फटकेबाजी करीत षटकार, चौकार लगावत फलक हालता ठेवला. पहिल्या आठ षटकात पोलीस संघाने पन्नास धावांची दुसऱ्या विकेट साठी भागीदारी केली. सुधीर वाघ 38 धावा काढून रिटायर्ड झाले. त्यानंतर आलेल्या गवळी यांनी उमाप यांना साथ दिली. दहाव्या षटकात शाहजी उमाप यांनी आपले अर्धशतक झळकावले अकराव्या षटकात एक धाव पाहिजे असताना शहाजी उमाप यांनी षटकार लगावत शानदार विजय संघाला मिळवून दिला.
आयजीच्या हस्ते पुरस्काराचे वितरण…
उत्कृष्ट फलंदाजी म्हणून (Hingoli cricket match) पोलीस निरीक्षक सुधीर वाघ तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पत्रकार संघाचे सुमित कान्हेड तर उमाप यांनी अर्धशतक ठोकल्याने त्यांनाही ट्रॉफी देऊन गौरव केला तर पत्रकार संघाचे कर्णधार दिलीप हळदे यांनाही ट्रॉफी देऊन पत्रकार संघाचा गौरव करण्यात आला.
खेळाचा आनंद लुटला पाहिजे…
पोलीस आणि पत्रकार यांचे ऋणानुबंध राहावेत यासाठीच मैत्री पूर्ण क्रिकेट सामना खेळवीण्यात आला, यात हार जीत काही न मानता खेळाचा आंनद लुटला पाहिजे असे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले.