मतदार संघातील दोन्ही तालुका काँग्रेसमय
मानोरा (Manora Congress) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी देवानंद पवार हे समस्या शोध दिंडीच्या निमित्ताने मतदार संघातील कारंजा व मानोरा तालुक्यातील गाव अन् गाव भेटी देऊन शेतकरी , शेतमजुर व बेरोजगार युवकाशी संवाद साधत त्यांच्या समस्या एकूण घेत काँगेस पक्षाचे विचार घराघरात पोहचविल्याने मतदार संघ काँग्रेसमय झालेला आहे.
काँगेस पक्षाच्या वतीने श्रावण मासातील नागपंचमी सन पासून श्रीक्षेत्र आसोला खुर्द येथील परमहंस श्री सोहंमनाथ महाराज संस्थान मंदिरावरून (Manora Congress) काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांच्या नेतृत्वात समस्या शोध दिंडीला सुरूवात झाली. शंभर दिवस चाललेल्या या समस्या शोध दिंडीने मतदार संघातील मानोरा व कारंजा तालुक्यातील गावागावात मार्गक्रमण केले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. गावागावातील नागरिकांनी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. यावेळी देवानंद पवार यांनी शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार विरोधी केंद्रातील मोदी व राज्यातील मिंधे सरकारचा जनतेसमोर पाढा वाचून गावकरी मंडळीशी संवाद साधून काँग्रेसचे विचार घराघरात पोहचविला. या काँग्रेसच्या समस्या शोध दिंडीमुळे मतदार संघ काँग्रेसमय झाल्याची चर्चा जनता जनार्दन करत आहेत.