Bacchu Kadu:- दिव्यांग बांधवांचे नेते बच्चु कडू (Bacchu kadu)यांचे राजकीय पुनर्वसन करावं यासह नांदेड(Nanded)
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागणीसाठी आज जागतिक दिव्यांग दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय.
दिव्यांग बांधवांचा नांदेडमध्ये आक्रोश मोर्चा
या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले आहेत. दिव्यांग बांधवांचे नेते बच्चुभाऊ कडू यांचं राजकीय पुर्नवसन करावं यासाठी नांदेडमध्ये दिव्यांग बांधव एकवटल्याचा पहायला मिळत आहे.