मानोरा(Washim):- बहुजन बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथे पालक मंत्री ना. संजय राठोड यांनी महायुती सरकार कडून कोटी रुपयाचे विकास कामे मंजूर करून आणली असुन विकासाची कामे दर्जेदार सुरू आहे. एका महंत महाराज यांनी पालकमंत्री ना. राठोड यांना विकास कामाबद्दल भाषणात बोलून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या महाराजांचे ते विधान चुकीचे व बिनबुडाचे आहे.
सर्व महंत व पोहरादेवी येथील जनता पालक मंत्री यांच्या पाठीशी
आम्ही सर्व महंत व पोहरादेवी येथील जनता पालक मंत्री यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणीही खोटी टीका करत राजकारण (Politics)करू नये, असे आपले मत पत्रकार परिषदेत(Press conference) महंत कबिरदास महाराज व धर्मपीठ भक्तीधामचे धर्मगुरु जितेंद्र महाराज यांनी मांडले.
पुढे धर्मगुरु जितेंद्र महाराज म्हणाले की, तिर्थक्षेत्र काशी पोहरदेवी व उमरी खुर्द संस्थान अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित होते. पालकमंत्री ना संजय राठोड यांनी ७०० कोटीच्या जवळपास पोहरादेवी व उमरी खुर्द तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी महायुती सरकारकडून निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे संत सेवालाल महाराज, संत डॉ रामराव महाराज, सामकी माता, संत जेतालाल महाराज मंदीर, भक्त निवास बांधकाम, नंगारा वास्तू आदीसह इतर विकास कामे गतीने व उत्कृष्ट दर्जाचे पारदर्शकतेने सुरू आहे.
पत्रकार परिषदेत महंत कबीरदास व धर्मगुरु जितेंद्र महाराज यांची माहिती
एका महाराज महंत याने पालक मंत्र्यांनी २० टक्के कमिशन घेत विकास कामात भ्रष्टाचार केलेला आहे, असे आरोप करत खोटे वक्तव्य केले आहे. हे त्या महाराजांनी केलेले वक्तव्य बिनबुडाचे असुन कोणत्याही प्रकारचा विकास कामात भ्रष्टाचार झालेला नाही. आम्ही सर्व महंत व पोहरादेवी येथील जनता पालकमंत्री ना संजय राठोड यांच्या पाठीशी असल्याचे मत पत्रकार परिषदेत महंत कबिरदास महाराज व धर्मगुरु जितेंद्र महाराज यांनी व्यक्त केले