प्रदुषणापासून आपले पर्यावरण वाचविणे आवश्यक!
मानोरा (Pollution-Free Diwali) : दिपावली हा आनंदाचा आणि उत्साहाचा सन असतो, यंदा दिवाळी साजरी करताना ही प्रदूषण मुक्त (Pollution Free) व पर्यावरणपुरक (Environmentally Friendly) साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक नैना पोहेकर (Police Inspector Naina Pohekar) यांनी केले आहे. दिवाळी साजरी करत असताना आपला आनंद इतरांसाठी नव्हे तर आपल्या स्वत:साठी नुकसानदायी ठरणार नाही, यासाठी प्रत्येकानी काळजी घेणे गरजेचे आहे. तेजस्वी दिव्यांनी सजलेली, फुलांच्या माळांनी सजलेली आणि भरपूर स्वादिष्ट मिठाईचा गोडवा असलेली ही दिवाळी सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरी करावी. दिवाळी हा सण खुप आनंद आणि नवीन उत्साह घेऊन येत असतो, सध्याच्या काळात दिवाळी निमित्त फटाके, रसायन आणि प्लास्टीकचा वापर वाढतो, परिणामी दिर्घकाळ प्रदुषण होते, या प्रदुषणापासून आपले पर्यावरण वाचविणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्याची नितांत गरज आहे.
फटाका मुक्ततेतून पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्या करीता सर्वांनी पुढाकार घ्यावा!
दिवाळी साजरी पर्यावरणासाठी अधिक चांगली बनविण्याकरीता पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फटाके (Firecrackers) नाकारणे आवश्यक आहे. फटांक्यामुळे अधिक प्रमाणात प्रदूषण होत असते, दिवाळी निमित्त अनेकजण एकमेकांना भेट वस्तू देत असतात. अशावेळी प्लास्टीक गिफ्ट रॅपरर्स वापरण्याऐवजी रिसायकल केलेले रॅपिंग पेपर वापरावे, दिवाळी निमित्त फटाके फोडण्या करीता लहान मुले अधिक आग्रही असतात. फटाक्यांमुळे काही जणांना दुखापतही होते. त्यातच फटांक्याच्या धुरामुळे प्रदूषण होते. त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळींनी आपल्या मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवणे ही काळाची गरज आहे. फटाका मुक्ततेतून पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्या करीता सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांनी केले आहे.