सेलू तालुक्यातील कोपरा गावातील घटना
– सोमेश ठाकरे
वर्धा (farmer died Case) : सेलू तालुक्यातील कोपरा येथील शेतकरी कवडू गुणबाजी राऊत वय 65 वर्ष याचा घराची भिंत अंगावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. कवडुजी राऊत यांच्या स्वतःचे घर आहे. आदल्या दिवशी परिसरात पाऊस झाला. त्यामुळे भिंत पडेल, म्हणून त्यांनी स्वतः भिंत पाडण्याचे (farmer died Case) ठरवले सकाळी सात वाजताचा दरम्यान कवडुजी हे घराची मातिची भिंत स्वतः पाडत असताना त्याचा अंगावर भिंत पडली. रस्त्यानी गावातील काही नागरिकांना ते खाली पडल्याचे दिसलें दवाखान्यामधे नेतेवेळी त्याचा मृत्यू झाला. त्याचा मागे मुलगा मुली असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.