(Gadchiroli) :- कोरची तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरीकांना आवागमनासह सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतुने शासकीय स्तरावरुन लाखो रुपये उपलब्ध करून देऊन पुल वजा बंधाऱ्यांचे बांधकाम मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र काही महिण्यांपुर्वीच बांधण्यात आलेला पुल वजा बंधाराऱ्याची वाल पावसाने वाहुन गेल्याने एकुणच उपविभागीय जलसंधारण कार्यालय कुरखेडाचा पुरता भोंगळ व मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
जलसंधारण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
अतिदुर्गम भागातील कोरची तालुक्याच्या नवरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत भिमपुर,साल्हे,भर्रीटोला व नवरगाव असे एकुण चार गावे येत असुन भर्रीटोला ते नवरगाव या मार्गावर जिल्हा संधारण अधिकारी जि.प. गडचिरोली, उपविभागीय जलसंधारण (water conservation) अधिकारी जि.प.(लपा)उपविभाग कुरखेडा अंतर्गत २० लक्ष ७० हजार २२३ रुपये किंमतीचे पुल वजा बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकाम (Construction) काही महिण्यांपुर्वीच करण्यात आले असतांना सदर ठिकाणी बांधकाम कार्यारंभ आदेश २२ डिसेंबर २०२० लिहीला असुन काम पुर्ण झाल्याचा दि.३० मार्च २०२१ लिहीण्यात आला असून दोष निवारण कालावधी तीन वर्षाचा लिहीण्यात आला आहे.
पुलाच्या वालचे दोन तुकडे पडुन २० लाख रुपये किंमतीचा पुल वजा बंधारा वाहुन गेला
सदर पुल वजा बंधाऱ्याचे बांधकाम गोंदिया(Gondia) जिल्ह्यातील मे.सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनीने केले असुन स्थानिक जबाबदार पदाधिकारी मात्र सदर बांधकाम काही महिण्यांपुर्वीच करण्यात आल्याचे सांगत आहेत. दरम्यान पावसाच्या पाण्याने पुलाच्या वालचे दोन तुकडे पडुन २०लाख रुपये किंमतीचा पुल वजा बंधारा वाहुन गेल्याने सदर बांधकामाचा दर्जा एस्टिमेट (estimate) नुसार असेल का?असा प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे. अतिदुर्गम भागात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नसतांना अनेक बांधकामे थातूरमातूर करून मलाई लाटण्याचा सर्रास गोरखधंद्या सुरु असतांना वरिष्ठ अधिकारी मात्र डोळेझाकुन बिले काढुन देत असल्याने शासनाला कोट्यावधिचा चुना लागत आहे.यामुळे गडचिरोली जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा कलंक धुतल्या धुतजात नसल्याने सदर पुल वजा बंधारा बांधकामाची जबाबदारी असलेल्या अभियंत्यास जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी धजावतील का?असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
बंधारा वाहुन गेल्याने नागरीकांच्या अडचणीत वाढ-सरपंच कौशल्या काटेंगे नवरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार गावातील नागरीकांच्या आवागमनाचा प्रश्न सुटावा करीता काही महिण्यांपुर्वी भर्रीटोला नवरगाव मार्गावर पुल वजा बंधारा बांधण्यात आला.मात्र पहिल्याच पावसात वाहून गेल्याने बांधकाम नियमानुसार करण्यात आला नसल्याने परिसरातील नागरीकांच्या अडचणीत भर पडली आहे.त्यामुळे या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नवरगावच्या सरपंचा कौसल्याबाई काटेंगे यांनी केली आहे.