ओडिशा (Port Fierce fire) : ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे बंदर असलेल्या पारादीप येथील मासेमारी बंदरात अनेक बोटींना आग लागली. आग विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती नाही. ओडिशातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप येथील नेहरू बांगला मासेमारी बंदरात गुरुवारी संध्याकाळी लागलेल्या (Port Fierce fire) भीषण आगीत दहा मासेमारी बोटी जळून खाक झाल्या.
माहितीनुसार, पारादीपमध्ये डिझेलवर चालणाऱ्या बोटी एकत्र ठेवल्यामुळे, आग इतर नऊ बोटींमध्ये झपाट्याने पसरली. या (Port Fierce fire) बोटींमध्ये डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, मासेमारीचे जाळे, प्लास्टिकच्या वस्तू, टायर आणि कपडे अशा अनेक ज्वलनशील वस्तू होत्या.
माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग इतकी (Port Fierce fire) भीषण होती की, अग्निशमन सेवांच्या नऊ पथकांना आग विझवण्यासाठी तैनात करण्यात आले. ज्यात पारादीप पोर्ट, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड (PPL) आणि जवळच्या पाच पोलिस ठाण्यांचे पोलिस यांचा समावेश होता.
यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु आगीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता (Port Fierce fire) जळून खाक झाली आहे. सध्या, पारादीपमधील नेहरू बांगला मासेमारी बंदरात 50 हून अधिक मोठ्या बोटी आणि 400 लहान बोटी आहेत.