हिंगोली (Hingoli Gram Panchayat) : महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1967 च्या नियम 2 (अ) मधील तरतुदीनुसार हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli Gram Panchayat) त्या तालुक्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी तालुकास्तरावर आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यासाठीच्या तारखाही निश्चित करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांना आरक्षण सोडत काढण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. सेनगाव व वसमत तालुक्याची आरक्षण सोडतीची बैठक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 22 एप्रिल, 2025 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. तर हिंगोली, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्याची आरक्षण सोडतीची बैठक संबंधित (Hingoli Gram Panchayat) तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता निश्चित करण्यात आली आहे.
वर नमूद केलेल्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी उक्त नमूद दिनांकास अनुसूचित जाती, (Hingoli Gram Panchayat) अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठीचे आरक्षण संबंधित तालुक्याच्या नियुक्त केलेल्या समन्वय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी दिले आहेत.