जवळाबाजार/हिंगोली (Power substation) : जवळा बाजार येथील 33 के व्ही वीज उपकेंद्रातील (Power substation) दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या पावर ट्रांसफार्मर बसवण्याच्या मागणीची पूर्तता आमदार राजू भैय्या नवघरे (MLA Raju Bhaiyya Navghare) यांनी केली असून रविवारी पहाटेच पावर ट्रांसफारर घेऊन ते जवळा बाजारामध्ये दाखल झाले होते. येथील वीज उपकेंद्र सन 1995 मध्ये निर्माण करण्यात आले होते. काळाच्या ओघात लगतच्या गावामध्ये नवीन वीज उपकेंद्र अस्तित्वात येऊनही जवळाबाजार वीज उपकेंद्रावरील कृषी पंपाचा भार वाढतच चालल्यामुळे कृषी पंपाच्या प्रत्येक फिडरवर महावितरण कडून फक्त चार तास वीजपुरवठा (power supply) करण्यात येत होता. यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला येत होता.
कृषी पंपाला पुरवठ्याचा प्रश्न सुटणार
या प्रश्नाबाबत विविध राजकीय पक्षांकडून वारंवार आंदोलने करण्यात आली. मात्र (Mahavitaran) महावितरण कडून पोटा येथे नवीन वीज उपकेंद्र व जवळाबाजार विविध उपकेंद्रात नवीन पावर ट्रान्सफॉर्मर बसवल्याशिवाय वीज प्रश्न सुटणार नाही असे वारंवार ठासून सांगितले जात होते. (Assembly Constituency) वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू भैया उर्फ चंद्रकांत नवघरे यांनी हा प्रश्न वारंवार शासन दरबारी मांडून नवीन (Power transformer) पावर ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतला. (Lok Sabha Elections) लोकसभा निवडणुकीच्या आधी फेब्रुवारी महिन्यात पावर ट्रांसफार्मरच्या ओट्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.
संपूर्ण उन्हाळी हंगाम अत्यंत कमी दाबाने व फक्त चार तास वीज पुरवठा शेताला होत असताना शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला होता. पावर ट्रान्सफॉर्मर नेमका कधी येणार याकडे शेतकरी डोळे लावून बसले होते. शेवटी रविवारी पहाटे राजू भैय्या नवघरे यांनी स्वतः पावर ट्रांसफार्मर घेऊन जवळा बाजारात दाखल झाले होते. या कामी महावितरण चे संचालक भादेकर यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी पावर ट्रान्सफॉर्मरची (Power transformer) पूजा करताना स्वतः आमदार राजू भैया नवघरे (MLA Raju Bhaiyya Navghare) , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाबाराव राखोंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद अंभोरे व ज्ञानदेव ढोबळे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश तात्या आहेर , तपोवन चे माजी सरपंच तुकाराम कदम, जगनराव कदम, नागेश डोंबे, बंसिधर क्षीरसागर , अभियंता शार्दुल जावडेकर व मेश्राम तसेच ऑपरेटर अमन पठाण व शेकडो शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी तातेराव ढोबळे, सदाशिव चेअरमन, दादाराव पावडे, कुंडलिकराव राखुंडे, तुकाराम कदम, संभाजी राखुंडे व बशीर कुरेशी या शेतकऱ्यांनी (Power transformer) पावर ट्रान्सफॉर्मर ची मागणी पूर्ण केल्याबद्दल आमदार चंद्रकांत नवघरे यांचा सत्कार केला.