छापे मारून वीज चोरी करणार्या आकडे बहाद्दरांवर गुन्हे दाखल
हिंगोली(Hingoli):- जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज चोरी होत असल्याने महावितरणच्या (Maha distribution) पथकामार्फत विविध ठिकाणी छापे मारून वीज चोरी(electricity theft) करणार्या आकडे बहाद्दरांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
सेनगाव तालुक्यातील चौंढी बु., चौंढी खु. व ब्राम्हणवाडा येथे वीज वाहिनीवर अनाधिकृतपणे आकडे टाकुन वीज चोरी करणार्या ५९ जणावर सेनगाव पोलिसात गुन्हे दाखल केले. वीज चोरीमुळे वीज गळतीचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे वीज चोरी रोखण्याकरिता अधिक्षक अभियंता आर. एम.चव्हाण यांनी महावितरणच्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक ठिकाणी वीज चोरी करणार्यांवर कारवाई केली जात आहे. सेनगाव तालुक्यातील चौंढी खुर्द, चौंढी बु. व ब्राम्हणवाडा येथे ३ व ४ मे रोजी सहाय्यक अभियंता सत्यनारायण वडगावकर यांच्यासह पथकाने केलेल्या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी आकडे टाकुन वीज (electricity)चोरी केल्याचे निदर्शनास आले.
वीज चोरीमुळे वीज गळतीचे प्रमाण अधिक वाढले
त्यावरून ८ मे रोजी सत्यनारायण वडगावकर यांनी सेनगाव पोलिसात रितसर फिर्याद दिली. ज्यामध्ये आत्माराम उत्तम काळे, साहेबराव पंढरीनाथ भालेराव, गायत्री बालाजी तांबोळी, सुभाष राजाराम काळे, दिलीप सदाशिव खिल्लारे, लक्ष्मण बाबा काळे, कैलास लक्ष्मण बनसोडे, विजय नथुजी काळे, संतोष भगवान वायचाळ, विठ्ठल विलास शिंदे, रामेश्वर निवृत्ती कव्हर, रामेश्वर नथुजी काळे, अमोल बद्री बनसोडे, मधुकर मारोती बनसोडे, ईश्वर चंदु बनसोडे, सोनु दिलीप गोडे, अविनाश मदन साळवे, जनार्धन ईश्वाजी काळे, गजानन एकनाथ जाधव, संजय त्र्यंबक काळे, लक्ष्मण खंडोजी इंगोले, दामोधर रामजी झाडे, यशवंत रामजी मोरे, गंगाराम गोविंदा शिंदे, नामदेव विठोबा काळे, लक्ष्मण निवृत्ती काळे, लक्ष्मण गणपती अंभोरे, नारायण नामदेव तांबोळी सर्व रा. चौंढी खुर्द, लक्ष्मीबाई बळीराम काळबांडे, गौतम कृष्णाजी भालेराव, बंडु देवराव खिल्लारे, त्र्यंबक नामाजी काळे सर्व रा. चौंढी बु. ता. सेनगाव तर ब्राम्हणवाडा येथील प्रकाश बुगाजी पंडित, सुभाष नारायण पंडित, संदिप शामराव पंडित, कुंडलिक मल्हारी ठोके, विश्वनाथ शंकर घंगाळे, घनशाम सूर्यभान पंडित, मदन दत्ता पंडित, विठ्ठल राजाराम पंडित, प्रकाश सुदाम वैद्य, गौतम बद्री पंडित, यशवंत संपत वैद्य, बायडाबाई लिंबाजी बनसोडे, रामराव सखाराम कोंघे, पांडुरंग गोविंदा कवर, मनिषा उद्धव राठोड, नारायण आनंदा वायचाळ, मोतीराम महादजी वायचाळ, रामराव तुकाराम वायचाळ, पंडिता तुकाराम वायचाळ, शांताबाई लक्ष्मण चव्हाण, कैलास पांडुरंग बरगे, परमेश्वर खंडुजी आडे, सिताराम नामदेव बोडखे, रामजी बळीराम वाघमारे, विष्णु उत्तम ढाकरे सर्व रा. ब्राम्हणवाडा ता. सेनगाव या ५९ जणावर वीज अधिनियम (Electricity Act) कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत.