पुसद (Mumbai Cricket Club) : तालुक्यातील देवठाणा येथील रहिवाशी बजरंग प्रभाकर डाखोरे नोकरी निमित्त दिग्रस येथे आहेत.त्यांचा मुलगा ईश्वर देशमुख इंग्लीश मिडीयम स्कुल दिग्रस येथे K.G- 2 मध्ये शिकत असून वयाच्या दुसऱ्या वर्षापासून क्रिकेटचा सराव करीत आहे . (Prabhas Dakhore) प्रभास डाखोरे चे व्हिडिओ युट्युब, फेसबुक , इंस्टाग्रामवर लोकप्रिय झाले आहेत. हेच व्हिडीओ बघून (Mumbai Cricket Club) मुंबई क्रिकेट चे कोच ज्वाला सिंग यांनी प्रभासला मुंबई क्रिकेट क्लबच्या निवडचाचणीसाठी बोलावले दि. 30 जुलै रोजी झालेल्या निवड चाचणीत प्रभासने उत्तम प्रदर्शन करुण यश प्राप्त केले. सदर बाब पुसद व दिग्रस वासियांसाठी आनंदाची आहे.
लहानपणापासूनच क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहणारा प्रभास असाच खेळत राहीला तर भारताच्या टीम मध्ये खेळण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होवू शकते. (Mumbai Cricket Club) मुंबई क्रिकेट क्लब चे मुख्य कोच ज्वाला सिंग श्रीलंकेचे कोच चमिंडा वास, रंगना हेराथ व वसिम जाफर हे प्रभासला क्रिकेटचे कोचिंग देतील प्रभासला तयार करण्यात प्रभासच्या वडिलांनी खूप परिश्रम घेतले. कोच सचिन इंगळे व एस.एस एस एस क्रिकेट अकॅडमी चे कोच सचिन शेंडे हे सध्या प्रशिक्षण देत आहेत . (Prabhas Dakhore) प्रभास नक्कीच भविष्यात भारत देशाचे प्रतिनिधित्त्व करणार यात तिळमात्र शंका नाही. त्याच्या या यशामुळे त्याच्यावर व त्याच्या आईवडिलांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
प्रभासने मिळवलेल्या या यशाबददल प्रभासचे आई वडील देवठाणा गावातील रहीवासी खासदार संजय उत्तमराव देशमुख, सौ. वैशालीताई देशमुख शाळेचे प्रिन्सीपल शानोज सर यानी प्रभासचे खूप खूप कौतूक केले आहे.