उमेदवार डॉ. श्याम जाधव (नाईक) अपक्ष लढण्याचा निर्धार
मानोरा (Dr. Mahesh Chavan) : कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघात अखेरच्या क्षणापर्यंत एकूण ५१ लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. छाननीच्या दिवशी अनेकांचे अर्ज वेगवेगळ्या त्रुटीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविले आहे. दरम्यान मोठा वाजागाजा करून नामांकन दाखल करणारे प्रहार पक्षाचे उमेदवार (Dr. Mahesh Chavan) डॉ. महेश चव्हाण यांचा अर्ज बाद झाल्यामुळे अपक्ष उमेदवार डॉ.श्याम जाधव(नाईक) यांची बाजू भक्कम होईल असे राजकीय चित्र दिसत आहे.
कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचे भाचे डॉ. महेश चव्हाण (Dr. Mahesh Chavan) यांनी पक्षनेते बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून नामांकन अर्ज दाखल केलेला होता. परंतु छानणीच्या दिवशी अर्जात त्रुटी निघाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद ठरविला. रा.कॉ शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव(नाईक) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली असून त्यांचा अर्ज कायम आहे. दरम्यान बंजारा समाजाला राजकीय पक्षाकडून उमेदवारी नसल्यामुळे डॉ. जाधव यांना समाजातून प्रचंड सहानुभूती मिळत आहे. मतदार संघात शेवटच्या घटकापर्यंत जाऊन सतत कार्य करणारे म्हणून सर्वदूर त्यांना समर्थन मिळत आहे. त्यातच डॉ. महेश चव्हाण (Dr. Mahesh Chavan) यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांची बाजू भक्कम झाल्याचे चित्र दिसत आहे.