बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा
औसा (Prahar Janashakti Andolan) : राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्या अन्नत्याग उपोषणाच्या समर्थनार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने औसा येथे तहसील परिसरात शुक्रवारी (दि.१३) अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी बच्चुभाऊ कडू (Bachu Kadu) यांचे चालू असलेल्या अन्नदात्याच्या कर्जमाफीसाठी न्याय मिळवून देण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाचा (Prahar Janashakti Andolan) आजचा सहावा दिवस आहे. तरीही भ्रष्ट व थापाड्या सरकारने कसलीच दखल घेतली नाही, असा आरोप करीत बच्चुभाऊ यांच्या समर्थात शुक्रवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने औसा तहसील कार्यालयात प्रहार जिल्हाध्यक्ष राजुभाऊ चौगुले, सल्लागार ॲड. विजयभाऊ पंडित, बालाजी जाधव यांच्या उपस्थितीत औसा तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ आनंदगावकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले व तहसीलदार यांच्या कार्यालयात झोपण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनात लक्ष्मण राऊत कार्याध्यक्ष, सयाजीराव पाटील, सहदेव घोडके ता. उपाध्यक्ष, रामभाऊ माडजे, विकास पांचाळ, रामेश्वर पाटवदकर, पप्पू भोसले, शाम गोरे आदींनी सहभाग घेतला.
तहसीलदारांच्या कक्षात काढली झोप…
अर्धा तास घोषणाबाजी करुनही तहसीलदार यांचा कुठलाही प्रतिनिधी भेटण्यासाठी आला नाही. कारण सरकारच झोप काढत आहे तर प्रशासनाचीही भूमिका लक्षात घेऊन प्रहार कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये झोप काढली. यावेळी तहसीलदार यांना प्रशासानाला जागे करण्यासाठी निवेदन देण्यात आले. भविष्यात दखल नाही घेतली तर (Prahar Janashakti Andolan) तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.