प्रहार: रविवार दि. २५ ऑगस्ट २०२४
लेखक : प्रकाश पोहरे,
संपादक, दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्रप्रकाश.
अमानवी घटनांमध्येही राजकारण…
आपला समाज, ज्याला आपण सभ्य समाज म्हणतो, तो खूपच खोलवर बिघडला आहे. निर्भया कायदा असूनही अशा घटनांची पुनरावृत्ती होणे, हे आपल्या समाजाच्या नैतिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. सत्य, निष्ठा, करुणा, सहकार्य, आदर, प्रामाणिकपणा, देशप्रेम यांसारख्या मूल्यांचा आपल्याला विसर पडला आहे, असे आत्ता वाटू लागले आहे. नैतिक मूल्ये ही केवळ कागदावरच राहिली आहेत, हे अत्यंत खेदाने नमूद करावे लागते. आजच्या स्पर्धात्मक युगात आपण ज्ञान मिळवण्यावर भर देतो; परंतु मूल्य शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
बदलापूर मध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. १३ ऑगस्टला घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी २० ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभर प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. बदलापूर, आळंदी, कोल्हापूर, दौड, कोलकाता आणि अनेक ठिकाणी घडलेल्या घटनांनी आपल्याला एक प्रकारचा धक्काच दिला आहे. अशा घटनांच्या बातम्या हादरवून सोडणाऱ्या आहेतः पण आपल्या समाजात अशा एका ‘कायरत्त’ वा शिरकाव झाला आहे, ज्यामुळे हिंसाचार, अत्याचार वगैरेकडे ‘पाहण्या’ची दृष्टी ठरू लागली आहे. ज्यामुळे अमानवी कृत्य कुरणी’ केलं आहे, यावर आपली प्रतिक्रिया ठरू लागली आहे. आपण आणि ते या मानसिक फाळणीच्या निकषावर सारं काही ठरू पाहत आहे. जात, धर्म, प्रांत, भाषा आणि सगळ्यात आक्षेपार्ह म्हणजे पक्ष, याआधारे कुठल्या बाजूला उभं राहायचं हे ठरते आहे, ‘आपल्या लोकांनी कुकर्म केलं असेल, तर त्याच्या समर्थनार्थ तर्क लढवत बसायचं, आणि त्यांनी केलं असेल, तर मात्र गहजब करायचा, आपण आणि ‘ते’च्या व्याख्या परिस्थितीनुसार बदलल आहेतः पण तरीही अशा घटना ऐकून काही अघटित घडलं, की माणसं आधी ते कोण घडवत आहे, हे पाहतात. ‘अत्याचारी आपले आहेत की ‘पीडित आपले’ आहेत, हे पाहतात. त्यानुसार भूमिका ठरवतात. सर्वच लोक इतके असंवेदनशील नसतात. पणअशा लोकांची संख्या गेल्या काही काळात खूपच वाहली आहे. हे मात्र खरं.
बदलापूर असो, वा ताजे घडलेले कोलकाता प्रकरण, एक अत्यंत संवेदनशील समाजमन जागृत झालं. त्याचबरोबर सत्ताधाऱ्याांच्या विरोधकांनाही विरोधाचं नवं हत्यार मिळाल्यासारखं झालं. मात्र, अशा घटनांना राजकारणाशी जोडायची ही वेळ नाही. ज्याप्रकारे बदलापूर प्रकरणावरून राज्यातील जवळपास सर्वच सामाजिक संघटना, सर्वच विरोधी पक्ष, सामान्य जनता रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळत आहे. परंतु इतके होऊनही सत्ताधारी राजकीय पक्षांच्या अंगाचे पाणी होताना दिसत नाही. राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, यापैकी एकही या घटनेचा साधा निषेध व्यक्त करताना दिसत नाही . अशाप्रकारे अमानती घटनांकडे पाहण्याची ही आपपरभावी वृत्ती त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे. कोणत्याही घटनेचे विविध कंगोरे आणि पदर तणसून न पाहता त्याकडे ‘आपले’ आणि ‘परके’ याच चश्यातून पाहणं समाज म्हणून केवळ धोक्याचं आहे. त्यातून न्यायाची संकल्पनाच बाद होते. सत्तेवर पक्ष कोणताही असो. नेता कोणत्याही जातीचा किंवा पक्षाचा असो, तो राज्यघटनेच्या चौकटीत काम करतो की नाही, जनतेला समान न्याय, संधी, अधिकार देतो की नाही, हे महत्वाचं. जो नेता ही किमान अपेक्षा पूर्ण करत नसेल, तो नेता कोणत्याही पक्षाचा, विचाराचा, धर्माचा, प्रांताचा, भाषेचा असोः तो नाकारला जायला हवा. यामध्ये एक मात्र विशेष दिसून येते, की अशा घटना घडल्या की, राजकीय पक्ष आणि त्यांच्या तैनाती फौजा एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढतात. जुने दाखले देऊन आपल्या कुकर्माकर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. भाजपवाले काँग्रेसच्या कारभाराचे वाभाडे काढतात आणि काँग्रेसवाले भाजपच्या पक्षांची ही लढाई एका पातळीवर फेस सेटिंग’ठी असते. लोक या लढाईकडे तटस्थपणे पाहून निर्णय घेणार असतील, तर त्यांचा पक्षावर वचक राहू शकतो. पण हल्ली लोकही पक्षाच्या तैनाती फौजाचे भागीदार बनले आहेत. त्यामुळे चूक झाली, घोडचूक झाली, तरी पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना जनमत दुरावण्याची भीती राहिलेली नाही. आपल्या सत्ताकाळात एखादे बदलापूर घडले, किंवा एखादे कोलकाता प्रकरण घडले, तर विषयाचे गांभीर्य समजून न घेता, तुमच्याही शासनात निर्भया’ घडले होते, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसतात. असा संवेदनहीनपणाचा प्रकार म्हणजे, संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने ही खचितच धोक्याची घडामोड आहे.
गेल्या काही वर्षांत घडलेल्या अशा काही गंभीर घटना आहेत, ज्या पाहता मन अगदी सुन्न होते.
- १. उन्नाव, उत्तर प्रदेशमधील बलात्कारामध्ये फक्त १२ वर्षांची मुलगी होती, बलात्कारानंतर मुलीसाठी न्याय मागणाऱ्या बापाला देखील जाळले होते. आरोपी होता भाजपा आमदार कुलदीप सेंगर या हरामखोराला वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांतून शेवटपर्यंत प्रयत्न झाला. अगदीच नाईलाज झाला आणि आरोप सिद्ध झाले तेव्हा त्याला काढावे लागले.
- २. हाथरस, उत्तरप्रदेशमध्ये एका १९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. मुलगी चमार म्हणजे दलित होती. बलात्कारी उच्चवर्णीय होते. मुलगी दोन आठवड्यांनी हॉस्पिटलमध्ये मरते. केस दाबण्यासाठी त्या मुलीचे शरीर तात्काळ जाळण्यात आले होते.
- ३. कठूवा, काश्मीर बलात्कार केसमध्ये ८ वर्षांच्या मुस्लीम मुलीवर बलात्कार करण्यात आला, तोही अनेक वेळा आणि अनेक दिवस. तेही एका मंदिरात बलात्कारी डुकरांच्या समर्थनार्थ वा देशात मोर्चे निघाले आणि यात भाजपा नेते खुलेपणाने सामील होते.
- ४. गुजरात दंग्यात बलात्कार झालेल्या बील्किस बानोचे दोषी आरोपी गुजरात इलेक्शनमध्ये तुरुंगातून सोडण्यात आले, आणि सगळ्यात आक्षेपार्ह म्हणजे त्यांचे हारतुरे घालून सत्कार वगैरे झाले.
- ५. रेपिस्ट गुर्मीत राम रहीमला तर जेलरने जेलच्या चाव्या दिल्या आहेत वाटते. तो त्याला वाटेल तेव्हा बाहेर येतो
- ६. रेसलर मुलीनी महानीच ब्रिजभूषण विरुद्ध आंदोलन केले. या विकृत इसमाविरुद्ध काहीही केस झाली नाही . याउलट समाजातल्या विषाणू पिल्लांनी रेसलर मुलींचे चारित्र्यहनन केले. आणि, नंतर येतो हा मुर्दा समाज जो मीडियामधली हाईप पाहून रिअॅक्ट होतो. काळे डीपी लावतो आणि चार पोस्ट शेयर करून आपण जागृत असल्याचे मानतो. खरेतर हा समाज पूर्णतः मुर्दा आणि हिपोक्राईट आहे. आजचा समाज पूर्णतः राजकीय, जातीय आणि धर्माध चष्म्यातून गोष्ट पाहतो आणि मग आऊटरेज करायचे की नाही हे ठरवतो.
नुकतेच कोलकाता येथे घडलेल्या केसमध्ये व्हिविटम बंगालमधली असल्याने मीडियाला कंठ फुटला आहे. हेच उत्तर प्रदेशमध्ये घडले असते, तर आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले असले आणि व्हिविटमचे कॅरक्टर तपासणे सुरू झाले असते . विनेशचे उदाहरण एकदम ताजे आहे. ते सोडा, मुलगी दलित असती तरी लोकांची झोप जागी झाली असती का, याबद्दलदेखील मला शंका आहे. ट्रेंड पाहून रिअॅक्ट होणाऱ्या लोकांची मला खूप कीव येते. ते मॅसेज वाचूनही कसेसे होते.
आपला समाज, ज्याला आपण सभ्य समाज म्हणतो, तो खूपच खोलवर बिघडला आहे. निर्भया कायदा असूनही अशा घटनांची पुनरावृत्ती होणे, हे आपल्या समाजाच्या नैतिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. सत्य, निष्ठा, करुणा, सहकार्य, आदर, प्रामाणिकपणा, देशप्रेम यांसारख्या मूल्यांचा आपल्याला विसर पडला आहे, असे आता वाटू लागले आहे.नैतिक मूल्ये ही केवळ कागदावरच राहिली आहेत, हे अत्यंत खेदाने नमूद करावे लागते. आजच्या स्पर्धात्मक्त युगात आपण ज्ञान मिळवण्यावर भर देतोः परंतु मूल्य शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. आपण इतके स्वार्थी झालेलो आहोत की, आपल्या मुलांना चांगले नागरिक बनवण्याची भावनाच मुळी शिल्लक राहिलेली नाही. शाळा, ज्याला आपण ज्ञानमंदिर म्हणतो, त्या ठिकाणीच लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडणे, हे अत्यंत वेदनादायी असून समाजातील मूल्य पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. शैक्षणिक संस्थादेखील आपल्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोषी असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी आपल्या संस्थेची बदनामी होऊ नये यासाठी प्रकरण दाढण्यातच धन्यता मानतात. शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेपेक्षा आपल्या प्रतिमेची अधिक चिंता वाटणे, ही शिक्षण क्षेत्रातील एक गंभीर बाब आहे. आपल्या विद्यार्थ्यावर एखाद्या विकृत माणसाने केलेल्या अत्याचारापेक्षा आपल्या संस्थेची प्रतिमा मोठी असू शकते का? याचे भानदेखील संस्थाचालकांना राहिलेले नाही, ही अत्यंत दुर्दैती बाब आहे. शाळा प्रशासनाचे हे कृत्य केवळ एका मुलीच्या आयुष्याशी खेळणे नाही, तर समाजाच्या भविष्याशीही खेळणे आहे. मुलींना सुरक्षित वातावरण न मिळाल्यास, देशाचे भक्तिव्य कसे उज्ज्वल होईल?
स्त्रीवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे असूनही, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. पोलिसांकडून फिर्यादीच्या तक्रारींना गांभीर्याने घेतले जात नाही. तपासप्रक्रिया मंदावते आणि पुरावे नष्ट होण्याची शक्यता वाढते. भ्रष्टाचारामुळे गुन्हेगारांना पैशाच्या जोरावर सुटका मिळते आणि पीडित महिलांना न्याय मिळणे कठीण होत चालले आहे. काही लोक आपल्या राजकीय पॉवरचा गैरफायदा करून स्त्रीवरील अत्याचार झाकुन टाकण्याचा प्रयत्न करतात. समाजात आपली प्रतिमा व प्रतिष्ठा जपण्याच्या नादात अनेकदा गुन्हे दाखल करताना आडकाठी आणली जाते, गुन्हे दाखल होऊच नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातो. पोलीस यंत्रणा राजकीय दबावाला बळी पडते व तपासात अडचणी निर्माण केल्या जातात आणि अनेकदा खोटे पंचनामे करून गुन्हेगारांना सुटका मिळवून दिली जाते. प्रभावशाली लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे हे आता कठीण होत चालले आहे. यामुळे पीडित महिलांना न्याय मिळणे अवघड होते व अनेकदा त्यांनाच समाजात बदनामीचा सामना करावा लागतो. न्याय व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांची कमतरता आणि त्यांच्याकडे असलेले कामकाज यामुळे खटले लांबणीवर पडत आहेत, न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या दिवसेदिक्स वाइलच चालली आहे. यामुळे पीडितेला न्याय मिळण्यात अनेक वर्षे लागतात. ‘Justice delayed is justice denied’ असा हा सगळा प्रकार आहे. न्यायदानाला होणाऱ्या विलंबामुळे पीडितेचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि न्याय मिळविण्यासाठी लागणारा पैसा यामुळेदेखील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळत नाही, यामुळे इतरांनाही गुन्हे करण्याचे धाडस होते.
अशा घटनांनी काही काळापुरता समाज खडबडून जागा होतोः परंतु काही वेळातच पुन्हा निद्रिस्त होतो. आता समाजातील प्रत्येक व्यक्तीला अशा विषयाबाबत जागरूक होण्याची वेळ आली आहे. आपल्या भावी पिढीला सुरक्षित वातावरण प्रदान करण्याची गरज आहे. आपल्या भावी पिचा सुरक्षित असल्यास समाजाचे भवितव्य अधिक उज्ज्वल होईल. भावी पिढीला शिक्षणासोब्ल निली मूल्यांची शिकवणदेखील देणे महत्त्वाचे आहे. समाज घडवताना आपल्या हातून झालेली चूक दुरुस्त करण्याची हीच वेळ आहे.
लेखक: प्रकाश पोहरे
प्रतिक्रिया देण्यासाठी 98225 93921 वर ‘थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सअप वर पाठवा.’
प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.