प्रहार शिक्षक संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनाची दखल
अमरावती (Prahar Teachers Association) : अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम जिल्हा परिपद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत प्रहार शिक्षक संघटना (Prahar Teachers Association) चांगलीच आक्रमक झाली असून. संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात पाचही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांच्यासह शेकडो शिक्षकांनी विभागीय आयुक्तालयावर धडक देत लक्षवेधी धरणे आंदोलन केले. अखेर या आंदोलाची दखल घेत विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी विभागातील सर्व जिल्हा परिषद सिईओ यांना आजच दि.१९ जून रोजी संध्याकाळी ६ पर्यंत प्रलंबीत समस्यांबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याचे सक्त आदेश दिले आहे. हयगय केल्यास कार्यवाही होईल अशी तंबी देखील आयुक्तांनी पत्रात दिल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
आजच ६ वाजेपर्यंत तत्काळ अहवाल सादर करा, हयगय केल्यास होईल कार्यवाही
विभागातील अमरावतीसह अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा अंतर्गत जिल्हा परिपद व खाजगी कार्यरत शिक्षकांच्या मागील काही वर्षापासून प्रलंबित समस्याबाबत प्रहार शिक्षक संघटना चांगलीच आक्रमक झाली असून संघटनेचे विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व शेकडो शिक्षक आज विभागीय आयुक्तालयावर धडकलेत. संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या प्रलंवित समस्येविषयी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र एक वर्षापासून निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने अखेर संघटनेने बेमुदत धरणे आंदोलनाची भूमिका घेत विभागीय आयुक्त कार्यालया समोर आज लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू केले.यात विभागातील शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी विविध प्रलंबित समस्यांच्या घोषणा शिक्षकांनी फलक उंचावून दिल्यात. या घोषणांनी आयुक्तालयाचा परिसर दणाणून गेला. यात, तत्काळ दुर्गम मधील शिक्षकांच्या बदल्या करा … पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे स्थानिक अनु. जमाती डी.एड. बेरोजगार उमेद्वारामधून भरा… प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा … आंतरजिल्हा बदली शिक्षकांना आगाऊ वेतन वाढ द्या.. आंतरजिल्हा बदली शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त व रुजू करा… आदिवासी भागातील शिक्षक व कर्मचारी यांना १५०० रु प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करा.
शेकडो शिक्षकांचा सहभाग, घोषणाबाजी
शिक्षकांची थकीत वेतन अदा करून दोपींवर कार्यवाही करा… संवर्ग एक मधील लाभ घेणाऱ्या शिक्षकांची मेडिकल बोर्ड कडून तपासणी करावी… पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करावी… संच मान्यतेचे अन्यायकारक निकप तात्काळ रद्द करावे.. सेवानिवृत्त शिक्षकांची प्रकरणे तत्काळ निकाली काढा…. आदी मागण्यांचे फलक उंचावून शिक्षकांनी आपला रोष यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी (Prahar Teachers Association) प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांचे नेतृत्वात अमोल आगे, शरद काळे, मंगेश टीकार, महेंद्र रोठे,कुलदीप डंभारे , अमोल वऱ्हेकर ,अमर भागवत, दिलीप इंगळे, अमोल गोपाळ,अमोल पंडीत,हेमंत बोरोकार,नागसेन रामटेके,राजेश राऊत, बलदेव येवले,सुरज महल्ले, नितेश मोरे, भगवान सरकटे, सुनील शामराव केराम, ईशान हांडे, सागर इंझळकर,प्रमोद करणकार ,गोपाल भोरखडे,कैलास अंबळकार ,मनोज महल्ले रविंद्र सोळंके , एस एस महल्ले, जव्वाद सर,सुधीर भुस्कुटे ,व्ही.एस. लोखंडे अतुल वानखडे ,हेमलता देशमुख, पूनम सोनवणे, अनुप डिके , योगेश खवले, नंदकिशोर धर्मे,रणजीत दळवी,चंद्रशेखर दाळू, निलेश नगरकर, बी.ए. देवरे, रवींद्र कान्हेरकर, गोपाल घाटे ,हितेश कनसरे, पल्लवी हरणे ,अमोल गोपाळ,प्रतिभा भुंबरे,रंजना ठाकरे,लीना भेलांडे, उमेश इंगोले ,अमोल घुमे,सचिन लंबे, देविदास बडगे, अर्चना शिरभाते, सचिन मेहेकरे, रविंद्र गुरमाळे ,अभिजीत पाटील ,सागर राऊत, संतोष मार्कड ,सतीश भगत, अविनाश मोहोळ, रमेश होले ,निखिल पाचघरे, सचिन शहाणे, उमेश वानखडे, संतोष गजभिये, मनोज जवंजाळ, संघटनेचे विभागातील जिल्हाध्यक्ष , पदाधिकारी व शिक्षक शेकडो संखेने सहभागी झाले होते.
या आहेत प्रलंबित समस्या
अमरावती विभागातील जिल्हा परिषद, खाजगी शिक्षकांच्या प्रलंबित समस्यामध्ये शासन धोरणानुसार आंतरजिल्हा बदल्या राबवण्यात याव्यात, शासन निर्णयानुसार जिल्हा अंतर्गत बदल्या राबवण्यात यावेत, संच मान्यता दिनांक १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करून सुधारित निर्णय घेण्यात यावा, अमरावती जिल्यातील आदिवासी भागात कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना तात्काळ पंधराशे रुपये प्रोत्साहन भत्ता व अतीरिक्त घरभाडे भत्ता लागू करावा, अमरावती विभागातील पदोन्नती प्रक्रिया त्वरित राबवण्याचे आदेश आपल्या स्तरावरून देण्यात यावेत, अमरावती व यवतमाळ पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे अनुसूचित जमातीतील आहर्ताधारक स्थानिक बेरोजगार उमेदवारातून तात्पुरत्या स्वरूपात विना विलंब भरण्यात यावीत, विभागातील पाचही जिल्हयातील मराठी व उर्दू माध्यमाची बिंदू नामावली त्वरित तपासून प्रमाणित करण्यात यावी, शिक्षकांचे वैद्यकीय व मासिक थकीत वेतन व्याजासह अदा करण्यात यावे व दोपींवर कारवाई करण्यात यावी.
आमदार बच्चू कडू चे समस्या निकाली कडण्याचे निर्देश
प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांना प्रलंवित समस्या तत्काळ मोडवण्याबाबत सूचित केले असून विभागीय बैठक घेऊन संघटनेला आंदोलनापासून परावृत्त करण्याचे म्हटले आहे.
समस्या मार्गी न लागल्यास पुन्हा तीव्र आंदोलन
शासन धोरणात्मक बाबींशी निगडीत असणाऱ्या शिक्षकांच्या समस्या असून त्यांची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडून मागील दोन वर्ष पासून होत नाही. शासन आदेश असतांना प्रत्येक विषयासाठी शासन स्तरावरून मार्गदर्शन मागविल्या जाते ही शोकांतिका आहे. प्रलंबित समस्या तत्काळ मार्गी न लागल्यास पुन्हा तीव्र व बेमुदत आंदोलन करण्यात येईल. एका आठवड्यात समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
– महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना