पुसद (Pusad Municipality) : पुसद नगरपालिके अंतर्गत येत असलेल्या तत्कालीन नगरसेवक व प्रशासन पदाधिकारी मुख्याधिकारी तथा नगराध्यक्ष यांच्या अत्यंत चुकीचे निर्णयामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक दरम्यान कॉरिडोर निर्माण केले गेले होते. नागरिकांच्या करा मधून काम निर्माण केले गेले. एका कंत्राट दलाला व राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांची आर्थिक घेत जपत.
मताचा जोग्याची टोपलीसाठी राजकीय नेत्यांनी शहराचे विद्रुपवीकरण करण्याचा निर्णय घेतला व ते अमलात आणला तर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सदरील अतिक्रमण उठविण्यासाठी अत्यंत मेहनत व प्रयत्न केले व अधिकार विरोधी पथक यांच्यावर या (Pusad Municipality) अतिक्रमणधारकांनी राजकीय फूस लागल्यावर हल्ला सुद्धा केला होता. प्रकरण शिवाय पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्या मुख्यधिकाऱ्यांची बदलीच करून टाकली.
नागरिकांना रस्त्यामध्ये वाहतूक करण्यासाठी अडचण ठरणारा अतिक्रमण आजही जशास तसे आहे. दि. तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची जाहीर सभा व रथ महोत्सव येणार असल्याच्या धास्तीने कधी न होणारी गोष्ट मात्र आज शक्य झाली असंच म्हणावं लागेल. अर्थातच पुसद मध्ये जे शक्य नव्हतं ते प्रकाश आंबेडकरांच्या सभेने पूर्ण करून दाखवलं. असंच चित्र कायम राहावं हीच अपेक्षा पुसद करांची हे विशेष.