देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wardha: डल्लेवालांच्या समर्थनात प्रकाश पोहरे यांचे २१ जानेवारीला उपोषण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवर्धा

Wardha: डल्लेवालांच्या समर्थनात प्रकाश पोहरे यांचे २१ जानेवारीला उपोषण

admin1
Last updated: 2025/01/17 at 2:17 PM
By admin1 Published January 17, 2025
Share

वर्धा(Wardha) :- भारतीय किसान युनियन चे नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या उपोषणाला साथ देण्याकरिता किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष जनलोकनायक प्रकाश पोहरे (Prakash Pohare)सरसावले असून त्यांनी २१ जानेवारी रोजी कान्हेरी सरप, अकोला येथील त्यांच्या शेतावर सहकाऱ्यांसह एक दिवसाच्या उपोषणाची घोषणा केली आहे.

सारांश
शेतकरी नेते डल्लेवाल यांचे प्राण वाचविण्यास पंतप्रधानांना पाठविले पत्रभारतीय किसान युनियनच्या समर्थनात सरसावली किसान ब्रिगेडउपोषणात सामील होण्याचे आवाहनरक्तदाब सातत्याने कमी जास्त होत असल्याने ५ रिवर्स हार्ट असोसिएशनची चमू आंदोलनस्थळी

शेतकरी नेते डल्लेवाल यांचे प्राण वाचविण्यास पंतप्रधानांना पाठविले पत्र

खन्नोरी बॉर्डरवर (Khannori Border) शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता मागील ५० दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले वरिष्ठ शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांची प्रकृती गंभीर असून अघटित समाचार येऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने चर्चा करून त्यांचे प्राण वाचविण्याचे आवाहन करणारे पत्र किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पोहरे यांनी पंतप्रधानांना (Prime Minister) पाठवून सकारात्मक उत्तराची अपेक्षा केली आहे. डल्लेवाल यांच्या उपोषणाच्या समर्थनात अकोला शहराजवळील त्यांचे कान्हेरी सरप येथील शेतावर २१ जानेवारी रोजी होणाऱ्या उपोषणात सर्व शेतकरी, शेतकरी नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किसान ब्रिगेड तर्फे करण्यात आले आहे. ज्यांना येणे शक्य नसेल त्यांनी आपल्या गावात उपोषणास बसावे, असेही सुचविण्यात आले आहे.

भारतीय किसान युनियनच्या समर्थनात सरसावली किसान ब्रिगेड

शेतमालाला हमी भाव आणि तो बाजारात मिळण्याचा कायदा, कर्जमाफी आदी मागण्यांकरिता भारतीय किसान युनियन (अराजनीतिक) चे नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी मागील ५० दिवसांपासून बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरू केले असून आज ते अर्धवटशुद्धीत असल्याने माझ्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करावी, असे त्यांनी सुचवून ठेवले आहे. आता पुढील चर्चा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, पण सरकार चर्चाही करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांच्या (Farmers)मागण्याकरिता जगजितसिंग डल्लेवाल यांनी जिवाची बाजू लावली आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने (High Court)त्यांच्या रक्ताचे अहवाल मागितले असून ते न्यायालयाच्या रजिस्टारकडे द्यावेत, असे सांगितले. जगजितसिंग डल्लेवाल शेतकऱ्यांच्या हिताकरिता लढत असून अघटित घडू शकते.

उपोषणात सामील होण्याचे आवाहन

शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या उपोषण समर्थनात त्यांना साथ देण्याची गरज आहे. अशा अवस्थेत किसान ब्रिगेडचे (Kisan Brigade) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २१ जानेवारी रोजी उपोषणाची घोषणा केली आहे. राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संयोजक बसवराज पाटील वीरपूर, तसेच कार्यकारी संयोजक सुरेंद्रसिंह बिष्ट ह्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना हे उपोषण थांबविण्याची गळ घातली आहे. जगजितसिंग डल्लेवाल यांनी त्यांचे निकटस्थ काकासिंह कोटरा यांना निरोप पाठवून माझ्या जिवाचे काहीही कमीजास्त झाले तरी शेतकऱ्यांच्या हिताचे हे आंदोलन असल्याने मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवा, असा संदेश पाठविला आहे. उपोषणादरम्यान माझे काही कमी जास्त झाले तर माझा मृतदेह खन्नोरी बॉर्डरवरील आंदोलनस्थळी ठेवला जावा, कोणीही जेवण न करता खन्नोरी बॉर्डरवर उपोषण करावे, काहीही झाले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन थांबू नये.

रक्तदाब सातत्याने कमी जास्त होत असल्याने ५ रिवर्स हार्ट असोसिएशनची चमू आंदोलनस्थळी

त्याचवेळी काही शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला (Central Govt.)इशारा दिला की काही अघटित झाले तर केंद्र सरकारला परिस्थिती सांभाळल्या जाणार नाही. २६ नोव्हेंबर २०२४ पासून जगजितसिंग डल्लेवाल यांनी त्यांना असलेल्या कॅन्सरचे औषध घेण्याचेही थांबविल्याची माहिती पहिल्यांदाच डॉ. गुरुसिमरनसिंग बुट्टर यांनी पत्रकारांना दिली. डॉ. धालिवाल आणि कुलदिप कौर यांनी त्यांच्या शरिरातले सोडियमचे प्रमाणही खूप कमी झाल्याचे सांगितले. रक्तदाब सातत्याने कमी जास्त होत असल्याने ५ रिवर्स हार्ट असोसिएशनची चमू आंदोलनस्थळी पोहोचली, त्यांनी जगजितसिंग इल्लेवाल यांची प्रकृती तपासली.

You Might Also Like

Gram Panchayat Officer: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले आयुक्ताकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर

Woman Heart Attack Death: कापूस वेचणीदरम्यान महिलेला हृदयविकाराचा झटका

Butibori Bus Station: बुटीबोरी बस स्थानक धूळ खात; जनतेचे करोडो रुपये मातीमोल!

EVM Room Inspection: निवासी उपजिलाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी ईव्हीएम कक्षाची केली पाहणी!

Korchi Police Station: कोरची पोलीस स्टेशनने मिळवुन दिले हरविलेले मोबाईल!

TAGGED: Central Govt, farmers, High Court, Khannori Border, Kisan Brigade, Prakash Pohare, Prime Minister
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli : अभ्यासाच्या तनावातून विद्यार्थिनीची कोर्टा येथे गळफास घेऊन आत्महत्या

admin1 admin1 March 19, 2025
China-Pakistan: ‘चिकन नेक’वर चीन-पाकिस्तानचा कब्जा? भारतासाठी ठरणार धोकादायक?
RSS Centenary: रा. स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त १०० कार्यक्रम
Kalmanuri Jugar Raid: कळमनुरी शहरा जवळील सार्थक धाब्याच्या पाठीमागे झन्ना मन्ना जुगारावर छापा
Sarada-Saraswati Vandana: लंडन येथे ध्वनीमुद्रीत झालेल्या “हे शारदे-सरस्वती वंदना” या गाण्याला भरघोस प्रतिसाद!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Panchayat Officer
विदर्भअकोला

Gram Panchayat Officer: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले आयुक्ताकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर

December 11, 2025
Woman Heart Attack Death
अमरावतीविदर्भ

Woman Heart Attack Death: कापूस वेचणीदरम्यान महिलेला हृदयविकाराचा झटका

December 11, 2025
Butibori Bus Station
विदर्भनागपूर

Butibori Bus Station: बुटीबोरी बस स्थानक धूळ खात; जनतेचे करोडो रुपये मातीमोल!

December 11, 2025
EVM Room Inspection
विदर्भवाशिम

EVM Room Inspection: निवासी उपजिलाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी ईव्हीएम कक्षाची केली पाहणी!

December 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?