संतनगरीत ना. प्रतापरावांचा रामलल्लाची मूर्ती देऊन सत्कार!
बुलढाणा (Prataprao Jadhav) : “योगीराज व्यासपीठ” (Yogiraj Vyaspeeth) या समूहाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्याच्या संतनगरीत आलेल्या ना. प्रतापराव जाधव यांचा अयोध्या मंदिरातील मूर्तीसम रामलल्लाची मूर्ती देऊन एका आध्यात्मिक भावात सत्कार करण्यात आला. आयुष्य आरोग्य विभागाचा स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) हे एनडीए. मंत्रिमंडळाचा शपथ व पदभार घेतल्यानंतर आज गुरुवार 13 जून रोजी पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यात आले ते (Gajanan Maharaj) संतनगरी शेगावमध्ये. योगीराज व्यासपीठ समूहाच्या वतीने याचठिकाणी त्यांचा सत्कार रामलल्लाची मूर्ती देऊन करण्यात आला. यावेळी समूहाच्या वतीने बलदेवराव चोपडे, पत्रकार राजेंद्र काळे, रमेश उमाळकर, सागर मोदी, गुलाबराव कडाळे, सिद्धेश्वर पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
“योगीराज व्यासपीठ” बुलढाणा जिल्हा
हा (Yogiraj Vyaspeeth) आध्यात्मिक विचारातून वैचारिक समूह निर्माण झाला होता ऑगस्ट 2008 मध्ये.. श्री संत गजानन महाराजांचा (Gajanan Maharaj) पालखी सोहळा परतीच्या शेवटच्या मुक्कामाला नागपंचमीच्या दिवशी खामगावला पोहोचणार होता. दुसऱ्या दिवशी खामगाव ते शेगाव ही पायी वारी करायची होती.. त्या पायी वारीत अध्यात्मिक भाव तर होताच पण, तत्कालीन मेहकरचे आमदार प्रतापराव जाधव हे मेहकर मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे तिथून विस्थापित होत असल्याने.. एप्रिल 2009 मध्ये होणाऱ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी त्यांचे लॉन्चिंग या वारीतून करण्याचे ठरले, झालेही तसेच.. प्रतापरावांचा चेहरा खासदारकीचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा घाटाखाली व जिल्हाभर त्या वारीतूनच गेला. सात-आठ महिने ते वातावरण कायम राहिले, अन् एप्रिल 2009 च्या निवडणुकीत (Prataprao Jadhav) प्रतापराव पहिल्यांदा विजयी झाले. पुढेही ही वारी अखंड चालू राहिली, अन् प्रतापरावांच्या विजयाची परंपराही चालू राहिली. त्यामागे निश्चितच संत गजानन महाराजांची कृपा आहेच, तशा भावनाही आज संतनगरीत ना. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केल्यात.
चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर प्रतापराव केंद्रात मंत्री बनले.. अन् मंत्री बनल्यावर ते बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदा पहिल्यांदा आले ते शेगावलाच. योगायोग पहा, ज्या वारीतून प्रतापराव खासदार बनले.. तीच वारी पंढरपूरला प्रस्थान करतेसमयी (Prataprao Jadhav) ना. प्रतापरावांनी तिचे स्वागत करून वारीत सहभागी घेतला !