बुलढाणा (Prataprao Jadhav launched Tobacco Free Abhiyan) : युवकांनी तंबाखू, सिगारेट सारख्या व्यसनापासून दूर रहावे.. असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केले. देशात तंबाखूमुक्त युवा अभियान (Tobacco Free Abhiyan) राबविण्यात येणार आहेत. नवी दिल्ली येथील लेडी हार्डिग वैद्यकीय महाविद्यालयात आज 24 सप्टेबरला त्यानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या (Tobacco Free Abhiyan) अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांना तंबाखू सेवनापासून दुर ठेवणे हा आहे.
तंबाखू सिगारेटमुळे होणाऱ्या आजाराविषयीची माहिती समाजाला देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे, भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांना तंबाखू-सिगारेट सारख्या व्यसनापासून ठेवण्यासाठी युवकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी माहिती देऊन जागृकता निर्माण करणे गरजेचे आहे अस मत केंद्रीय आयुष , आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. तंबाखू सिगारेट यासारख्या घातक उत्पादकाच्या विरोधात सरकारच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. या (Tobacco Free Abhiyan) अभियानात सर्वांनी सहभागी होऊन याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून देणे गरजे आहे. एक निरोगी आणि तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे या आपल्या भावी पिढीच्या सुरक्षेतेसाठी तंबाखूमुक्त जीवन हा संकल्प करू या, असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले.
जनजागृती मोटरसायकल रॅलीला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी झेंडा दाखविला. तंबाखू सिगारेटच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि आजाराविषयी समाजात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने तंबाखूमुक्त युवा अभियान राबविण्यात येत आहे. या (Tobacco Free Abhiyan) अभियानाच्या शुभारंभनिमित्य जनजागृती मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ केंद्रीय आयुष, आरोग्य व कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी झेंडा दाखवुन केला.