आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा “श्री”च्या चरणी अर्पित करून दिला प्रत्यय!
बुलडाणा (Prataprao Jadhav) : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत पायी चालणाऱ्या लाखो भक्त गणांच्या आरोग्य सुविधेसाठी लासुरा फाटा येथे वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष उभारण्यात आला होता. या विशेष कक्षाला केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण (Prataprao Jadhav) राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट देऊन आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा “श्री”चरणी अर्पित करून प्रत्यय दिला.
पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शनसाठी गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटपून पुन्हा शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. तब्बल 61 दिवसाचा पायी प्रवास आटपून आज रविवार 11 ऑगष्टच्या सकाळीच ही पालखी शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. या पालखीसोबत खामगाव ते शेगाव असा पायी प्रवास बुलढाणा जिल्ह्यातील लाखो भक्तगण करत असतात. भक्तांच्या सेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांच्या संकल्पनेतून विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष लासुरा फाटा येथे उभारण्यात आला होता या मदत कक्षेत दोन रुग्णवाहिका डॉक्टर्स, नर्सेस यांचा पुरेसा स्टॉप आणि औषधी साठा कक्षेत ठेवण्यात होता.
या मदत कक्षाला केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी भेट दिली व वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत करत त्यांना अभिवादन केले आणि गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. आज गजानन महाराजांची पालखी संतनगरी शेगावमध्ये दाखल झाली, या पालखीसोबत लाखोभक्तगणांनी पालखीसोबत पायी चालून वारीचा आनंद घेतला. वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत करण्यात आली .