योगेश जाधव फाऊंडेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Prataprao Jadhav) : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत (Prataprao Jadhav) खासदार प्रतापराव जाधव यांनी चौथादा विजय मिळवित केंद्रात राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त केला. त्यामध्ये सर्व पत्रकार बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने योगेश जाधव यांनी २१ जून रोजी तीन तालुक्यांतील पत्रकारांना आमंत्रीत करून (Yogesh Jadhav Foundation) जाधव फाऊंडेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान चिन्ह देवुन सत्कार केला.
सि.राजा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुतणे योगेश जाधव यांनी (Yogesh Jadhav Foundation) जाधव फाऊंडेशनच्या वतीने नटराज हॉटेलच्या सभागृहात पत्रकारांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि स्वत: प्रत्येक पत्रकारांना फोन लावून कार्यक्रमाला बोलावून घेतले . कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचकावर योगेश जाधव, पत्रकार भगवान साळवे, प्रताप मोरे, सुषमा राऊत, पंचाळ सर, सुनील मतकर, हे होते तर चिखली, दे राजा , सि.राजा या तीन तालुक्यातून आलेले नागरे सर , अशोकराव इंगळे, सचिन खंडारे, भगवान नागरे, सुनिल अंभोरे, राजू मोरे, अनिल दराडे, गजानन घुगे,असे एकूण ३० ते ४० पत्रकार बांधवांची उपस्तिथी होती.
यावेळी सुषमा राऊत, पंचाळ सर , भगवान साळवे यांनी पत्रकारांच्या समस्या तसेच प्रत्येक तालुक्यांत पत्रकार भवन , व राहण्यासाठी घर , मानधन असे अनेक समस्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या पर्यत पोचवून त्या सोडवाव्या अशी विनंती केली . त्यामुळे (Yogesh Jadhav Foundation) योगेश जाधव यांनी सर्व पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्याच बरोबर योगेश जाधव यांनी सागितले की, अचानक पत्रकारांना का बोलावले या पाठिमागचे उद्दिष्ट काय आहे असा प्रश्न सर्वांना पडला असेल पण सर्वांना बोलावणे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान मोठीं धावपळ सुरू होती आणि प्रत्येकास संपर्क करता आला नाही. त्यातच सर्वांच्या सहकार्याने खासदार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा निवडणुक जिंकले आणि केंद्रात राज्यमंत्री झाले. त्यामुळे सर्वांना बोलावून त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे तसेच यापुढे कोणतीही कामे, समस्याचे निवारण आम्ही मंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लावू असे त्यांनी सागितले. यावेळी आलेल्या सर्व पत्रकारांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.