बुलढाणा (Prataprav Jadhav) : बुलढाणा येथे आपल्या कर्मभूमी व मातृभूमीतील आपल्या घरातील लोकांकडून नागरी सत्कार सोहळा स्वीकारल्यानंतर (Prataprav Jadhav) ना. प्रतापराव जाधव हे भावनिक झाले होते. ना. मंत्रिमहोदयानी या नागरी सत्कार सोहळयासाठी मेहनत करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले, पण त्यातही कार्यक्रमाची सुरुवात ज्या योगनृत्याने झाली त्या नृत्यामधील बाल कलाकार क्षितिज गजेंद्र निकम व कु. ज्ञानदा योगेश काळे यांच्या नृत्यकौशल्याने मंत्रिमहोदयांचे विशेष लक्ष आकर्षित केले.
त्यामुळेच शेकडो लोकांचे सत्कार स्वीकारल्यानंतरही मंत्रिमहोदयानी या दोन्ही बालकलाकार व त्यांचे नृत्यशिक्षक यांना वैयक्तिक मंचावर बोलावून त्यांची आस्थेने चौकशी केली, त्यांचे कौतुक करून त्यांना अधिक मोठ्या मंचावर आपल्या कलेचे प्रदर्शन करता यावे यासाठी आपल्या अधिनस्थांना सुचित केले. (Department of Ayush) आयुष विभागाचा स्वंतत्र प्रभार असलेल्या मंत्रिमहोदयाना, आयुषचा अविभाज्य भाग असलेल्या योग या प्राचीन कलेतुन आपल्या नृत्यकौशल्याने अनोखी मानवंदना देणाऱ्या या बालकलाकार चमूचे सर्वत्र कौतुक होत आहे !