बुलढाणा (Prataprav Jadhav) : केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी आज सोमवार 12 आगस्ट रोजी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार कार्यालयात बसून जनतेच्या तक्रारी समस्यां जाणून घेत “ऑन द स्पॉट” (On the Spot) निपटारा केला.
केंद्रीयमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीनिमित्त आले होते. त्यावेळी मंत्री महोदयांनी आलेल्या नागरीकांच्या तक्रारी समस्या व अडचणी व इतर समस्या जाणून घेतल्या. त्याचवेळी त्यांनी संबंधित यंत्रणेला दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ तक्रारींचे आणि समस्यांचे निराकरण केले. विविध विकासात्मक कामासंदर्भातही नागरिकांच्या सोबत चर्चा केली. आगामी काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक बाबींवर चर्चाही केली.