बुलढाणा (Prataprav Jadhav) : आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मिळाल्यानंतर (Prataprav Jadhav) ना. प्रतापराव जाधव यांनी देशातील जनतेचा आरोग्य जपण्याला प्राथमिकता देऊ, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी आरोग्यावर काम करणाऱ्या अध्यात्मिक गुरु श्री श्री श्री रविशंकर (Shri Ravi Shankar) यांची भेट घेऊन त्यांच्याचरणी नतमस्तक होत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी जाधव कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते.
देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी (PM Modi) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav( यांनी व्यक्त केली.
मंत्रालय जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी अध्यात्मिक गुरु योगाचार्य श्री श्री श्री रविशंकर (Shri Ravi Shankar) यांची सहकुटुंब जाऊन भेट घेतली आणि रविशंकरजी यांचे आशीर्वाद घेतले. देशातील जनतेची आरोग्य सेवा करून लोकाभिमुख कार्य करा, असा सदिच्छापर आशीर्वाद रविशंकरजी (Shri Ravi Shankar) यांनी त्यांना दिला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राजेश्रीताई जाधव, मुलगी सौ. नम्रता वायाळ, जावई सोहम वायाळ, सुनबाई मयुरीताई ऋषिकेश जाधव, त्यांचे स्वीय सहायक डॉ. गोपाल डिके, राहुल सोळंकी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.