राजुरा येथे सत्कार सभा
चंद्रपूर (Pratibha Dhanorkar) : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) याना तिकीट मिळू नये, म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे (MLA Subhash Dhote) यांनाच सुपारी देण्याचा काँग्रेस मधील काही लोकांनी प्रयत्न केला असल्याचे खळबळजनक वक्तव्य करीत नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नाव न घेता काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते (Vijay Vadettiwar) विजय वडेट्टीवार यांचेवर निशाणा साधला. (Pratibha Dhanorkar) धानोरकर यांच्या या वक्तव्याने काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळ सह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची नाव न घेता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचेवर टीका
या वक्तव्यासोबतच त्यांनी खासदार या नात्याने आता लोकसभा क्षेत्रातील सर्वच तिकिटाचे वाटप मी करणार असल्याचे जाहीर करीत वडेट्टीवार याना शह देण्याचा प्रयत्न केला. राज्यात जर काँग्रेसची सत्ता आली तर मंत्रिपद गडचिरोलीच्या व्यक्तीला नाही तर सुभाष धोटे याना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीररीत्या सांगून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांना शह दिला आहे. (Lok Sabha Elections) लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाचे हारतुरे अद्याप संपण्याआधीच खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी केलेल्या वक्तव्याने काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजी उफाळून समोर आली.