नवी दिल्ली/मुंबई (IPL 2025 Mega Auction) : आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, सर्व संघांना कायम ठेवण्यासाठी खेळाडूंची निवड करावी लागेल. मुंबई इंडियन्स, केकेआर, सीएसके आणि राजस्थान या संघांसाठी हे काम सोपे नसेल. त्याचबरोबर (Preity Zinta) प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्जमध्येही अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. अशा परिस्थितीत पंजाबसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूची निवड करणे कठीण ठरू शकते.
लिव्हिंगस्टोन आणि मॅथ्यूजवर लक्ष
गेल्या मोसमापर्यंत लियाम लिव्हिंगस्टोन आणि मॅथ्यू शॉर्ट आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळत होते. हे दोन्ही खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममधून जात आहेत. या दोन्ही खेळाडूंनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. अशा (IPL 2025 Mega Auction) परिस्थितीत या दोन पंजाबपैकी कोणाला कायम ठेवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T-20 सामन्यादरम्यान लिव्हिंगस्टोनने 47 चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 87 धावांची शानदार खेळी खेळून संघाला विजयाच्या जवळ नेले. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल यांनी अवघ्या 47 चेंडूत 90 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या (IPL 2025 Mega Auction) भागीदारीमुळे इंग्लंडने दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव केला. आता मालिका 1-1अशी बरोबरीत आहे.