मानोरा(Washim):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा विरासत १२७ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नंगारा भवन या वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी पोहरादेवी येथे येणार असून याची जय्यत तयारी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री(Guardian Minister) संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात जोरात सुरू असून अंतीम टप्यात आली आहे. मंगळवारी ( दि. १ ऑक्टोंबर ) रोजी पंतप्रधान यांच्या दौऱ्यानिमित पोहरादेवीत नैसर्गिक आपत्ती विभागाच्या वतीने मोक ड्रील करण्यात आले.
७२५ कोटी रुपयाचा निधी आणून सर्वांगीण विकास पालकमंत्र्यांनी साधला
पालकमंत्री संजय राठोड यांच्या सहा वर्षाच्या तपानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तू संग्रहालयामध्ये(Architectural Museums) बंजारा समाजाची संस्कृती जीवनशैली समाजाचा इतीहास दर्शविला गेला जाणार आहे. राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा व संत डॉ रामराव बापू यांचे स्वप्न करण्यासाठी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द चा ७२५ कोटी रुपयाचा निधी आणून सर्वांगीण विकास पालकमंत्र्यांनी साधला आहे. एकूण १६ एकर जमिनीवर बंजारा विरासत या प्रकल्पासाठी शासनाकडून १६७.९ कोटी रुपये मंजूर करून आणले आहे. शनिवारी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमरावती येथून संरक्षण दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने सकाळी १० वाजता पोहरादेवी येथे दाखल होणार आहे . सुरुवातीला जगदंबा देवीचे दर्शन घेऊन संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यावर बंजारा विरासत नंगारा वस्तु संग्रालयाचा लोकार्पण सोहळा पार पाडतील.
टेन्ट हाऊस मध्ये राज्यातील निवडक १०० शेतकऱ्यांशी संवाद साधणार
तदनंतर हेलिपॅड जवळील टेन्ट हाऊस मध्ये राज्यातील निवडक १०० शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. वाईगौळ परिसरातील ४० एकर परिसरात उभारलेल्या भव्य सभा मंडपाच्या सुमारे तीन लाख आसन क्षमता असलेल्या सभास्थळी नागरिकांना संबोधित करणार आहेत. राज्यातील सभेकरिता पोहरादेवी येथे येणाऱ्या नागरिका साठी २२०० राज्य शासनाच्या एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी चार हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला असून नागरिकांना सभास्थळी सोडत असताना त्याची कसून तपासणी केल्या नंतरच सभास्थळी सोडल्या जाणार आहे. बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याकरीता देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक सभेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान राज्यचे मुखंमंत्री, राज्यपाल, दोन उपमुख्यमंत्री करीता हेलीपॅड (Helipad) ची व्यवथ्या करण्यात आली असुन तीन हेलीपॅड चे कायमस्वरूपी बांधकाम करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम जिल्हयाचे जिल्हाधीकारी व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात महसूल, पोलीस सार्वजनीक बांधकाम, कृषि , विज वितरण कंपनी विभागाचे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. पोहरादेवीला येण्यासाठी सिंगद, उमरी खु , पंचाळा व दिग्रस कडून येणाऱ्या नागरीकांसाठी त्याच रस्त्याच्या बाजुला शेतात वाहनाच्या पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे.