हिंगोली (Hunger strike) : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी ते आजेगाव पादंन रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली यांनी मागील काही दिवसांपासुन बंद केल्याने शेतकर्यांना शेतामध्ये जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पादंन रस्ता तात्काळ तयार करा असे निवेदन यापुर्वी देण्यात आले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने २७ ऑगस्ट रोजी उपोषण गुराढोरासह ठिय्या आंदोलन (Hunger strike) कार्यालयासमोर करण्यात आल्याने अधिकार्यांची चांगलीच भबेरी उडाली. आणि जोपर्यंत म्हाळशी- आजेगाव पादंन रस्ता तयार केला जाणार नाही. तोपर्यंंत आंदोलन व उपोषण सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांच्यासह शेतकर्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या दुर्लक्षामुळे म्हाळशी येथील पादंन रस्ता मागील काही दिवसांपासुुन बंद अवस्थेत आहे. शेतकर्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने शेतीची मशागत तशीच राहुन गेली आहे. पांदन रस्ता उपविभागीय कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे बंद झाल्याने शेतकर्यांना शेतात पिकांना खते देण्यासाठी फवारणी करण्यासाठी व दैनंदिन शेतीच्या कामाकरीता जाणे अवघड झाले आहे. (Hunger strike) रस्ता पुर्णपणे बंद असल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच हिंगोली ते आजेगाव, रिसोड रस्त्यावरील म्हाळशी या गावाजवळ आधी फरशीचा पुल होता.
या ठिकाणी नविन पुल सार्वजनिक बांंधकाम विभागाने बांधण्यात आल्याने या अधिकार्यांनी म्हाळशीकडे जाणारा पादंन रस्ता पुर्णपणे बंद केला आहे. हा रस्ता तात्काळ बांधकाम करून सुरू करावा अशी मागणी २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (Hunger strike) उपोषण व गुराढोरांचे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांच्यासह रामेश्वर बरडे, गजानन गायकवाड, पांडुरंग बरडे यांच्यासह अनेक शेतकर्यांनी दिला होता. २७ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हिंगोली येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन गुराढोरासह अनेक शेतकर्यांनी व महिलांनीही केले आहे.
सा.बां. चे उपविभागीय अभियंंता सुदेश देशमुख यांनी आंदोलन स्थळी भेट दिली असता आंदोलन कर्त्यांच्या मागण्या जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता शेतकरी नेते डॉॅ. रमेश शिंदे हे आक्रमक होत तात्काळ रस्ता म्हाळशीचा तयार करा तेव्हाच आंदोलन मागे घेतल्या जाईल असा पवित्रा घेतला. (Hunger strike) आंदोलन कर्त्यांनी कार्यालयासमोरच चुलीवर स्वयंपाक करून उपोषण कर्त्यांना व अधिकार्यांनाही जेवनाचा आस्वाद घेण्यास भाग पाडले. यावेळी डॉ. रमेश शिंदे, संदेश देशमुुख, माधव कोरडे,रामेश्वर बरडे, गजानन गायकवाड, पांडुरंग बरडे यांच्यासह महिला व पुरूष सहभागी झाले होते.