1 तास 40 मिनिटे दिले भाषण, 16 वेळा बायडेनचा उल्लेख?
वॉशिंग्टन (Donald Trump Speech) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 4 मार्च रोजी काँग्रेस (American House) ला संबोधित करताना आतापर्यंतचे सर्वात मोठे वार्षिक राष्ट्रपती भाषण दिले. हे भाषण 1 तास 40 मिनिटे चालले, ज्याने माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन (President Bill Clinton) यांचा 25 वर्षांचा जुना विक्रम मोडला. 2000 मध्ये क्लिंटन यांनी 1 तास 28 मिनिटांचे भाषण दिले होते. तर गेल्या वर्षी जो बायडेन (Joe Biden) यांचे भाषण फक्त 1 तास 7 मिनिटे होते.
आपल्या भाषणादरम्यान (Donald Trump) ट्रम्प यांनी जो बायडेन यांचा 16 वेळा उल्लेख केला. त्यांनी (Joe Biden) बायडेन यांना ‘सर्वात वाईट राष्ट्रपती’ म्हटले आणि अंड्यांच्या वाढत्या किमतींपासून ते सीमा सुरक्षेपर्यंतच्या मुद्द्यांसाठी त्यांना जबाबदार धरले. सहसा राष्ट्रपतींची भाषणे भविष्यातील योजनांवर केंद्रित असतात. परंतु ट्रम्प यांनी भूतकाळातील धोरणांवर टीका करण्यावर अधिक भर दिला. हे असामान्य होते, कारण 2017 मध्ये (Donald Trump) ट्रम्प यांनी स्वतः आणि 2021 मध्ये बायडेन (Joe Biden) यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात ‘माजी प्रशासनाचा’ क्वचितच उल्लेख केला होता.
ट्रम्प यांच्याकडून निवडणुकीतील विजयाचा उल्लेख
आपल्या भाषणात, (Donald Trump) ट्रम्प यांनी त्यांच्या मागील निवडणुकीतील विजयाचा आणि भविष्यात पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्याच्या शक्यतांचा उल्लेख केला. त्यांनी बायडेनच्या (Joe Biden) धोरणांवर टीका केली आणि स्वतःला एकमेव ‘वाजवी पर्याय’ म्हटले. (Donald Trump) ट्रम्प यांचे हे भाषण 2024 च्या निवडणुकीच्या तयारीचा एक भाग असू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. (Joe Biden) बायडेनच्या उणीवा वारंवार अधोरेखित करून त्यांनी रिपब्लिकन मतदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला.
ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त भाषण देणारे अध्यक्ष
2017 ते 2020 पर्यंत, (Donald Trump) ट्रम्प यांच्या भाषणांची सरासरी लांबी 1 तास 20 मिनिटे होती. जी आधुनिक इतिहासातील कोणत्याही राष्ट्रपतींपेक्षा सर्वात जास्त होती. 2019 मध्ये ट्रम्प यांनी 1 तास 22 मिनिटे भाषण देऊन क्लिंटन यांच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले.