यवतमाळ (Chemical fertilizers) : जिल्हयात सध्या तीव्र दुष्काळाचे सावट आहे. खरीप हंगामाचा सामना कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे (Chemical fertilizers) भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गतवर्षी समाधानकारक पीक न झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यात पीककर्जासाठी अर्ज करूनही अनेक शेतकयांचे कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर खरिपातील पिकांची पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतीचे उत्पादन खर्चही वाढणार आहे.
ही बाब ऐन दुष्काळात शेतकड्डयांची चिंता वाढवणारी ठरणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपूर्वी शेतीच्या मशागतीची कामे आटोपून घेतात. त्यानंतर मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा असते. साधारण 22 मे नंतर शेतकरी खते (Chemical fertilizers) व बियाण्यांची खरेदी करतात. उत्पादन चांगले मिळावे यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सध्या कृषी सेवा संचालकांनी खतांचा व बियाणांचा साठा करून ठेवणे सुरू केले आहे.