रुग्णांना वेळेवर उपचार मिळेना
तालुका अधिकार्यांकडे अतिरिक्त पदभार
तालुका अधिकार्यांकडे अतिरिक्त पदभार
परभणी/ताडकळस (Health Center) : पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व ग्रामपंचायत कार्यालय असलेल्या ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गत काही दिवसांपासून रिक्त पदांचा आजार झाला असून येथील दोन्ही (Health Center) वैद्यकीय अधिकारी पदे गत काही दिवसांपासून रिक्त असुन या गंभीर प्रकारामुळे कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी देखील वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ रिक्त पदांची पुर्तता करण्याची मागणी रुग्णांतुन होत आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व ग्रामपंचायत कार्यालयासह लोकसंख्या असलेल्या ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. ताडकळस येथील (Health Center) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत फुलकळस, लिमला, निळा, खुजडा, बलसा बु हे पाच उपकेंद्र असुन २५ गावांचा समावेश आहे. येथील दोन्हीही वैद्यकीय अधिकारी पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. यामुळे कार्यरत कंत्राटी व प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांना रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ताडकळस येथे ५० गावांचे पोलीस ठाणे असल्याने या ठिकाणी नेहमीच छोटे- मोठे भांडण तंटे होऊन जखमी झालेल्यांची संख्या मोठी आहे. तसेच या ठिकाणी या परिसरातील ३० ते ४० गावांची बाजारपेठ आहे. तसेच विविध शासकीय व निम शासकीय संस्था असल्याने येथील (Health Center) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत नसलेल्या गावातील अनेक रुग्ण देखील याच ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी येत असल्याने दररोज १५० ते २०० बाह्य रुग्णांची संख्या आहे. परंतु या ठिकाणी कार्यरत आरोग्य कर्मचारी अनेक वेळा वेळेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नसल्याचे प्रकार घडत आहेत.
या सर्व प्रकारच्या अडचणी लक्षात घेऊन गेले १० ते१२ वर्षांपासून ताडकळस येथे ग्रामीण रुग्णालय करण्यासाठी स्थानिक राजकीय पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी मागणी केली आहे. परंतु या मागणीला प्रशासनासह शासनाने केराची टोपली दाखवली असुन या ठिकाणी नविन इमारत बांधकामासाठी निधीवरच बोळवण केली आहे. या गंभीर प्रकाराकडे (Health Center) आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ रिक्त पदांची पुर्तता करण्याची मागणी रुग्णांतून होत आहे.
वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार तालुका आरोग्य अधिकार्यांच्या खांद्यावर
ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी पदे आहेत.परंतु काही महिन्यांपासून ही दोन्ही पदे रिक्त असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सध्या दोन कंत्राटी डॉक्टरांकडून चालविण्यात येत आहे. तसेच ताडकळस येथील वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार पूर्णा तालुका आरोग्य अधिकारी डॉ व्ही .आर.पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे . परंतु कार्यरत अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी रुग्णांतुन येत आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी तालुका (Health Center) आरोग्य अधिकारी तथा अतिरिक्त पदभार असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या ठिकाणी रिक्त पदांची पुर्तता तात्काळ करावी अशी मागणी रुग्णांतुन होत आहे.