आजपासुन असहकार आंदोलन, जिल्हात उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती (Teachers Andolan) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबत शासनाने घेतलेले घातक निर्णय आणि शाळा, शिक्षण ,विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने आज पासून शिक्षकांनी काळी फीत लावून कामकाज सुरु आहे. (Teachers Andolan) आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्हात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. असे सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने कळविले आहे.
काल पासून सुरू झालेल्या काळी फीत आंदोलनात आणि आज पासून व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर पडण्याच्या आंदोलनात (Teachers Andolan) आपला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. तसेच २५ सप्टेंबरला होणाऱ्या आक्रोश महामोर्चात सामील होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संबंधाने शासनाच्या धोरणास प्रखर विरोध करावा अशी कळकळीची विनंती राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. सर्व (Teachers Andolan) संघटनांच्या वज्रमुठीला अधिक बळकट करूया.असे आवाहन अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने केले आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार २५ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता एस टी डेपो पासुन महामोर्चा काढण्यात येणार आहे.
- १५ मार्च, ५ सप्टेंबर चे शासन निर्णय रद्द करणे.
- विद्यार्थी आधार कार्ड आधारित संचमान्यता धोरण रद्द करणे.
- विद्यार्थी गणवेश अविलंब मिळावेत.
- पाठ्यपुस्तके तातडीने पुरवावीत व पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात.
- शैक्षणिक-अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात दुरुस्ती करणे.
- जि प शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करणे.
- १०-२०-३० सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देणे,
- १ नोव्हेंबर २००५ पूर्व जाहिरात निघालेल्या जि प शिक्षकांना १९८२ ची पेन्शन आदेश निर्गमित करणे,
- अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना TET अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करणे.
- शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी.
- वाढती अनेकविविध अभियाने, उपक्रम, निरनिराळे सप्ताह, बहि:शाल संस्थांच्या परीक्षा, online माहित्या, माहित्यांची वारंवारता हे सर्व ताबडतोब थांबवणे.
टप्पे निहाय आंदोलन
(१) मंगळवारपासून काळी फीत लावून विरोध प्रदर्शन
(२) बुधवारपासून राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक सर्व तथाकथित प्रशासनिक WhatsApp Group वरून बाहेर पडून असहकार सुरू करणार
(३) बुधवारी दि. २५ सप्टेंबर रोजी सामूहिक किरकोळ रजा व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी २५ सप्टेंबर रोजी सामुहिक रजा घेऊन (Teachers Andolan आंदोलनात सहभागी व्हावे असे सर्व शिक्षक संघटना जिल्हा समन्वय समिती अमरावती यांनी केले आहे.