Nashik:- नाशिक लोकसभा निवडणुकीत राजकारणाचे शुध्दीकरण मोहीम गाजवल्या नंतर महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज आता वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Prime Minister Narendra Modi) प्रचार कार्यात व्यस्त आहेत.याच प्रचारादरम्यान रामायणामध्ये प्रभु श्रीरामांची(Lord Sri Rama) यशस्वी भुमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते तसेच भाजपाचे मेरठ (उत्तरप्रदेश) चे लोकसभा उमेदवार अरुण गोविल यांनी शांतीगिरीजी महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला.
अरुण गोविल यांनी घेतली शांतीगिरीजी महाराजांची भेट..
राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे यासाठी इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणून राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता शांतीगिरीजी महाराजांनी नाशिक मधून जोरदार अपक्ष निवडणूक लढवली. निवडणुकीत फॉर्म भरण्यापासून तर निवडणूक (Elections)पूर्ण होई पर्यंत महाराज चर्चेत राहिले. महाराज सध्या वाराणसी येथे मोदींचा प्रचार करत आहेत.यावेळी प्रचारा दरम्यान परमपूज्य शांतीगिरीजी महाराजांची रामायणामध्ये प्रभु श्रीरामांची भुमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते तसेच भाजपाचे मेरठ (उत्तरप्रदेश) चे लोकसभा उमेदवार अरुण गोविल यांनी भेट घेतली. गोविल यांनी शांतीगिरीजी महाराजांचे आशीर्वाद घेतले.यावेळी उपस्थित भाविकांनी गोवील यांना महाराजांच्या देशभक्ती विषयी माहिती दिली. लढा राष्ट्र हिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा असा विचार घेऊन जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी नाशिकची लोकसभा निवडणूक सत्यमार्गाने लढवली आणि गाजवली सुद्धा.
शुभारंभा पासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत शांतीगिरीजी महाराज सर्वथा चर्चेत
निवडणुकीच्या प्रचार शुभारंभा पासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत शांतीगिरीजी महाराज सर्वथा चर्चेत राहिले. ना कुणा कडून पैश्यांची आशा, ना कुठला स्वार्थ..ना मतदारांना प्रलोभन. महाराजांच्या शिलेदारांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून राजकारणाची शुध्दीकरण(Purification) मोहिमेचा जोरदार शुभारंभ केला. यामुळं दूषित झालेल्या राजकारणात एक चांगल्या विचारांची ठिणगी टाकण्याचे महत्कार्य स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी केले. भविष्यात या ठिणगीचे रूपांतर निश्चितच स्वार्थी विचारांना भस्मसात करून देशभक्तीचे विचार सर्वांमध्ये रुजतील असा विश्वास महाराजांसह भक्तांना आहे. दृढ निश्चय व निष्काम हेतू मनी ठेऊन देशभक्तीसाठी जय बाबाजी भक्त परिवारातील ‘शांतीदूत’ घरोघरी पोहचले. त्यांनी महाराजांचे देशभक्तीपर विचार मनामनात पोहचवले. महाराजांनी नाशिक मधून अपक्ष निवडणुक लढवली असली तरी इतर राज्यभर त्यांनी महायुतीला मतदान करण्याचे संकेत दिले होते. स्वामी शांतीगिरीजी महाराज सध्या उत्तर प्रदेश मधील वाराणसी(Varanasi) येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमात वार्षिक जपानुष्ठान सोहळा संपन्न करतांनाच राजकारणात चांगले व्यक्तिमत्व आले पाहिजे, टिकलेही पाहिजे व हिंदुत्वाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ते प्रचार करत आहेत.त्यासाठी वाराणसी येथील घराघरात महाराजांचे शिष्यगण पोहचत आहेत.