Nanded (Nanded):- नांदेड लोकसभेची पोटनिवडणुक व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मैदानात उतरले आहेत. त्यांची आज नांदेड शहरात जाहीर सभा पार पडणार आहे.
नांदेड शहरात जाहीर सभा
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील धुळे येथे पहिली प्रचार सभा झाली. सलग दुसर्या दिवशीही मोदी हे राज्याच्या दौर्यावर असून आज ११ वाजता विदर्भातील अकोला (Akola)येथील दुसरी प्रचार सभा आटोपून ते नांदेड येथील तिसर्या प्रचार सभेसाठी दुपारी दाखल होत आहेत. त्यांची ही सभा मोदी मैदान असर्जन, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपा उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्यासह जिल्ह्यातील एकूण ९ विधानसभा मतदारसंघामधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या सर्व उमदेवार व महायुतीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.