परभणी-पाथरी (Parbhani):- तालुक्यातील वडी येथील प्रियंका शिंदे हीची महसुल विभागात (Department of Revenue) तलाठी पदी निवड झाली असुन निवडी नंतर तीचे आगमन मुळगावी वडी येथे होताच ग्रामस्थांकडून कौतुकस्पद कामगिरी करत गावाचे नाव उंचावल्याचे म्हणत नागरी सत्कार करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
वडी येथील अल्पभुधारक शेतकरी कारभारी आसाराम शिंदे यांची मुलगी प्रियंका हिने घरच्या अंत्यत हालाखीच्या परिस्थितीतुन मिळविलेल्या यशाबदल प्रियंका सह सर्व कुटुंबाचा वडी येथील ग्रामस्थानी सोमवार २ डिसेंबर रोजी नागरी सत्कार (felicitation) केला. यावेळी उपसरपंच सिध्देश्वर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य , माझ गांव, माझ योगदान उपक्रमातील युवक, युवती आदींची उपस्थित होते.