सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Soybean Crop) : यावर्षी सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी पिकावर हजारो रुपये खत , औषधीचा खर्च केला मात्र ऐन (Soybean Crop) सोयाबीनला शेंगा लागण्याच्या वेळेवरच अचानक सोयाबिन पिकावर हुमनी अळी आणि पिवळसर रंगाच्या किडरोगाने आक्रमण केले त्यामध्ये ५० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामध्यें शेतात ५० टक्के वाचलेले सोयाबीन पिकाचीच सोंगणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे सोयाबीन सोंगणीचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे.
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द महसूल मंडळात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या कपाशीची लागवड करतात. परंतु कपाशी पिकावर खर्चच जास्त आणि उत्पन्न कमी अशामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशी पेक्षा सोयाबिन ची जास्त प्रमाणावर पेरणी केली आणि जसे जसे (Soybean Crop) सोयाबिन पिक चांगलें दिसू लागले तसे तसे शेतकरी खत औषधींचा खर्च करून टाकला.परंतु ऐन सोयाबिन पिकाला शेंगा लागण्याची सुरवात होताच अचानक सोयाबिन पिकावर हुमनी अळी आणि पिवळसर रंगाच्या किडरोगाचे आक्रमण होवून ५० टक्के सोयाबिनचे नुकसान झाले तर ५० टक्के पिक कसेबसे रोगातून वाचले असले तरी शेंगाध्ये पाहिजे तसे दाने भरले नाही. आता एका पाठोपाठ सोयाबिन वाळण्यास सुरवात होवू लागली असल्याने शेतकरी सोयाबीन सोंगणीकरीता मजुरांच्या शोधात घरोघरी जावू लागला आहे.
मागील वर्षी मजुरांचे (Soybean Crop) सोयाबीन दर २८०० ते ३००० रुपये होते. मात्र आता ३००० रुपये प्रती एकरापेक्षा अधिक दर वाढविले आहे तरी सुध्दा मजूर मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्याची मोठी चिंता वाढली आहे. त्यामुळे सोयाबीनवर झालेला खर्च आणि सांगण्याची मजुरी यातून (Soybean Crop) सोयाबिनचे होणारे उत्पन्न हे पाहता शेतकऱ्याच्या हाती फक्त सोयाबीन पिकाचे कुटारच शुल्लक राहते की काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.