हिंगोली (Prof. Bankat Yadav) : प्रा. बंकट यादव यांची महाराष्ट्रा नंदलाल राज्य कुस्तीगीर परिषदेच्या तांत्रिक सरचिटणीस पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
परभणी जिल्हा कुस्तिगीर संघटनेचे अध्यक्ष, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील कुस्तीपटुचे मार्गदर्शक शौर्य , ध्येर्य आणि सामर्थ्याचे प्रतिक राज्यशासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय कुस्तीकोच प्रा. डॉ. बंकट यादव (Prof. Bankat Yadav) यांची महाराष्ट्रा राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदी तांत्रिक सरचिटणीस बिनविरोध निवड झाली तसेच मराठवाडा विभगीय चिटनीस पदी वामन मारोती गाते यांची निवड झाली आहे काम करण्याची संधी प्रा. बंकट यादव यांना मिळाल्याने मराठवाड्यातील कुस्ती प्रेमी व कुस्ती पटू पैलवान यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.




