आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके यांच्या वतीने पत्रकार परिषदेतून माहिती
यवतमाळ (Sardar Vallabhbhai Patel) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्य ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुशंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्यांनंतर भारताला राष्ट्र म्हणून ५६० पेक्षा अधिक संस्थानाना एकत्र करून देश एक संघ ठेवण्याचे काम देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके यांनी दिली. 
त्यानंतर सरदार पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या जयंती निमित्य घेण्यात येणार्या कार्यक्रमाची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
पुढे बोलतांना अॅड. चौहान म्हणाले की भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशात ३१ ऑक्टोबर ते ६ डिसेंबर पर्यंत चालणार असून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आचारसंहिता पुढील काळात लागू होवू शकत असल्याने,महाराष्ट्रामध्ये मात्र ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 
यात पदयात्रा, निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. (Sardar Vallabhbhai Patel) यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद सर्कल , नगरपरिषदमध्ये प्रभागांनुसार हे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संपूर्ण देशभर हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष चौहान यांनी केले. यावेळी आ. राजू तोडसाम, जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, शंतनू शेटे उपस्थित होते.
