मानोरा (Exam center) : तालुक्यातील विठोली येथील अति संवेदनशील वसंतराव नाईक विद्यालय येथे दि. १३ फेब्रुवारीला मराठी विषयाचा पेपर सुरु असतांना केंद्राबाहेर हुलड बाजी करणाऱ्या ६ इसमावर ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी प्रतिबंधक कारवाई केली.
मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे विठोली येथील वसंतराव नाईक विद्यालय अतिसंवेदनशील केंद्र असल्याने या केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे . गुरुवारी मराठी विषयाचा (Exam center) पेपर सुरु असतांना केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी जमावातील काही लोकांनी हुलडबाजी केली. यावेळी ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी गर्दी नियंत्रणात आणली व यातील आसोला येथील सचिन चंद्रकांत सोनिवाळ, जयदेव प्रेमसिंग जाधव कारखेडा, नरेंद्र विष्णू काजळे विठोली, अक्षय मोतीराम नाटकर वाईगौळ, सुजित रमेश राठोड मानोरा, अक्षय कमलसिंग कटारे यांचेवर प्रतिबंधत्मक बी. पी. ऍक्ट ११०, ११७ अंतर्गत कारवाई केली. ही (Exam center) कारवाई ठाणेदार प्रवीण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण आलापूरकर, राहुल जयसिंगकार यांनी केली.
परीक्षा केंद्रावर शांतता ठेवावी!
मानोरा तालुक्यातील विठोली केंद्र अतिसंवेदनशील असून (Exam center) परीक्षा दरम्यान नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यापुढे नागरिकांनी गर्दी करून परीक्षा दरम्यान बाधा पोहचविणाऱ्या नागरिकावर कारवाई करण्यात येईल.
– प्रवीण शिंदे, ठाणेदार पोलीस स्टेशन मानोरा