नानव्हा ग्रामपंचायतीचा उपक्रम
सालेकसा/साखरीटोला (Property tax) : सालेकसा पंचायत समिती (Panchayat Samiti) अंतर्गत येणार्या नानव्हा ग्रामपंचायत कार्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित आहे. यंदा (flag hoisting) ध्वजारोहण करण्याचा मान गावातील ३० वर्षीय सुलोचना ठाकरे यांना मिळाला आहे. सुलोचना ठाकरे यांनी ग्राम पंचायतीचा संपूर्ण (Property tax) कर भरणा केला असून, त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे.
ग्राम पंचायतीचा संपूर्ण कर भरणा
ग्रामपंचायत नानव्हाच्या वतीने अभिनव उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमातंर्गत वर्षभर (Salekasa gram) ग्रामपंचायत नियमित मालमत्ता कराचा भरणा करणार्या खातेदाराच्या पत्नीच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण करण्यात येणार, असे ठरविण्यात आले होते. सदर उपक्रम मागील दोन वर्षांपासून राबविला जात आहे. यंदा दुसरे वर्ष आहे. ग्राम पंचायतच्या वतीने आकारण्यात येणारे विविध (Property tax) कर वेळेवर भरणा करून ग्राम विकासात सहकार्य करणार्याच्या नागरिकांच्या सन्मानार्थ हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. यातंर्गत महाराष्ट्र दिन, १ मे रोजी (Salekasa gram) ग्राम पंचायतीत ध्वजारोहण करण्याचा मान गावातील सुलोचना ठाकरे यांना मिळाला आहे. सुलोचना ठाकरे यांनी ग्राम पंचायतीचा संपूर्ण कर भरणा केला असून, ईश्वरचिट्टीने त्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे उद्या (ता.१) आयोजित ग्राम पंचायतीच्या ध्वजारोहण सोहळ्यात सुलोचना ठाकरे ध्वजारोहण करणार आहेत.
सोडत पध्दतीने काढले नाव
ग्रामपंचायत (Salekasa gram) कार्यालयात सरपंच गौरीशंकर बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वर चिट्टीव्दारे तीन वर्षीय मुलगी किर्तीका गौतम हिच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. त्यात सुलोचना राजेश ठाकरे हे भाग्यवान विजेता ठरले. ग्रामपंचायत कार्यालयात उद्या सूलोचना ठाकरे यांचे हस्ते ध्वजारोहन होणार आहे. दरम्यान ग्रामपंचायतच्या वतीने सुलोचना ठाकरे यांचे स्वागत करुन साडी-चोळी भेट देण्यात आले. यावेळी सरपंच गौरीशंकर बिसेन, उपसरपंच उर्मिला भंडारी, ग्रामसेवक शिवाजी राठोड, माजी सरपंच सोमाजी कटरे, सदस्य प्रशांत टेभुरकर, सोमेश्वर वरखेडे, मुनीबाई ठाकरे, भाग्यश्वरी कटरे, अशोक कटरे, विजयकुमार शरणागत, उषा हरिणखेडे, सुनिता भोंडे, परीचर देवेंद्र शेंडे, राकेश भंडारी, संगणक चालक हेमेन्द्र पटले व गावकरी उपस्थित होते.