परभणीतून मानवत पोलिसांचे हद्दपारीचे २६ प्रस्ताव
परभणी/मानवत (Manvat police) : सण उत्सव काळामध्ये कोणत्याही प्रकारे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी (Manvat police) पोलीस प्रशासनाकडून समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले जातात.मानवत पोलिसांनी १६ व १७ सप्टेंबर या दोन दिवसांकरीता एकूण २६ समाजकंटकां विरोधात हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले आहेत.
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या आदेशा प्रमाणे गणेशोत्सव विसर्जन शांततेत पार पाडावे या दृष्टीकोनातून असामाजिक तत्वे, समाजकंटक, गंभीर गुन्हे दाखल असलेले व्यक्ती, दारुची विक्री करणारे इसम, गुटखा विक्री करणारे, महिलांची छेड काढणारे तसेच गुंड प्रवृत्तीचे व झोपडपट्टी दादा यांच्या विरुध्द प्रतिबंधात्मक कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात आली. सपोनि. संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली (Manvat police) पोलीस अंमलदार भारत नलावडे, गोविंद वड, शक्ती नैताम, अतुल पंचांगे, मुन्नु शेख, डि.जी. गायकवाड, एस. पाळवदे, उध्दव जगाडे, मुखीद शेख, विलास मोरे यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत.
सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी (Manvat police) पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात येतो. समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींवर कारवाया केल्या जातात. मानवत पोलिसांनी गणेशोत्सव व इतर सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर हद्दपारीचे प्रस्ताव तयार करुन पाठविले आहेत.