भारत विकास विकलांग केंद्र, पुणे यांचे आयोजन
परभणी (Health Camp) : भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र नॅचूरल गॅस लि. यांच्या सामाजिक बांधिलकी (सीएसआर) निधीतून व परभणी मेडिकल कॉलेज यांच्या साह्याने परभणी मेडिकल कॉलेज पाथरी रोड येथे (Health Camp) मोफत दिव्यांग कृत्रिम अवयव मोजमाप तपासणी शिबीराचे २९ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आल्याचे भारत विकास परिषद विकलांग केंद्राच्या विनय खटावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
शहरातील हॉटेल ग्रीनलिफ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेस डॉ.विवेक नावंदर, भारत विकास विकलांग केंद्राचे विनय खटावकर, नवनीत पाचपोर व प्रशास ठाकूर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. विवेक नावंदर यांनी शिबिराच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. तसेच भारत विकास विकलांग केंद्राच्या विनय खटावकर यांनी शिबीराच्या संपूर्ण नियोजनाची व अत्याधुनिक मॉड्यूलरची माहिती दिली. यावेळी बोलतांना खटावकर म्हणाले की, (Health Camp) मोजमाप तपासणी शिबिरासाठी विकलांग केंद्राच्या ९१७५५५८३५६ आणि अनिकेत – ९४२२७९७१०६ या मोबाईल क्रमांकांवर स्वत: दिव्यांग बांधवांनी संपर्क करून नोंदणी करावी, पुर्व नोंदणीशिवाय शिबिरात प्रवेश दिला जाणार नाही.
त्यामुळे दिव्यांगांनी तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. परभणी मेडिकल कॉलेज येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत तपासणी शिबीर होणार असून त्यासाठी शहरातील वैâ.रावसाहेब जामकर नुतन विद्यालय जिंतूर रोड येथून दिव्यांगांना ये-जा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोजमाप तपासणी शिबिराची सर्व व्यवस्था आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात परभणी मेडिकल कॉलेज येथे करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना (Health Camp) मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात येणार आहे. (Health Camp) मोफत दिव्यांग कृत्रिम अवयव मोजमाप तपासणी शिबीरास जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी नोंदणी करण्याचे आवाहन भारत विकास विकलांग केंद्राचे विनय खटावकर व डॉ. विवेक नावंदर यांनी केले आहे.