देसाईगंज (Gadchiroli) :- सन २०२२ मध्ये ब्रम्हपुरी सेक्स रॅकेट (Sex racket) प्रकरणातील मुख्य आरोपी मंजीत लोणारे व त्याची पत्नी चंदा लोणारे या दाम्पत्यांना ब्रम्हपुरी पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाचे देसाईगंज कनेक्शन समोर आले होते. दरम्यान त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती करत मंजीत लोणारे याने दिल्ली येथे मॉडलिंगचा व्यवसाय करणार्या एका २६ वर्षीय महिलेला देसाईगंज शहराच्या लॉजवर देहव्यापार करण्यास भाग पाडल्याचे समोर येते न येते तोच शहराच्या अनेक लॉजवर अद्यापही देहव्यापाराचा गोरखधंदा जोमात सुरुच असल्याने संबंधित लॉजच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे.
प्रकरणाशी संबंधित लॉजच्या संचालकांवरही कारवाई करण्याची मागणी
ब्रम्हपुरी येथील गजानन नगरीत वास्तव्यास असलेल्या मंजीत लोणारे तसेच चंदा लोणारे या दाम्पत्याने शहरात अल्पवयीन मुली आणुन सेक्स रॅकेट चालवित असल्या प्रकरणी अटक करून ब्रम्हपुरी पोलिसांनी बोलते केले असता प्रकरणाशी संबंधित ९ जणांना अटक करण्यात आली होती.यावरून मंजीत हा अडचणीत असलेल्या गरजू मुलिंच्या असहायतेचा फायदा घेत देहव्यापार (prostitution) करायला भाग पाडत असल्याचे यामुळे चव्हाट्यावर आले आहे. दिल्ली येथील २६ वर्षीय महिलेला पहिल्या पत्नीला घटस्फोट (Divorce) देऊन लग्न करण्यासह घर घेण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढल्यानंतर तिच्या मजबुरीचा फायदा घेत तिला देहव्यापार करण्यास भाग पाडले होते.
लॉजवर येणार्या कोणत्याही जोडप्याला कुठलेही ओळखपत्र न देता ठराविक रक्कम घेऊन रुम देत
देसाईगंज शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल असून अनेक हॉटेल ग्राहका अभावी खालीच राहात असल्याने हॉटेलचा मेंटेनन्स खर्च काढण्यासाठी म्हणून अनेक हॉटेल संचालक मंजीत सारख्या एजंटांना हाताशी धरून लॉजवर येणार्या कोणत्याही जोडप्याला कुठलेही ओळखपत्र न देता ठराविक रक्कम घेऊन रुम देत असल्याचे सांगितले जात आहे.या धंद्याच्या माध्यमातून आंबट शौकिनांचे फावत असले तरी अनेक अल्पवयीन मुली या धंद्यात ओढल्या जात असल्याने हॉटेल संचालकांच्या एकुणच भुमिकेबद्दल पालक वर्गातुन चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत आहे. तथापी या गोरखधंद्याला यथाशिघ्र लगाम लावण्यासाठी ठोस उपाययोजना अंमलात आणल्या जावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.