लातूर (Latur):- कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ लातूर जिल्हा वकील मंडळाच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
कोलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार
बांग्लादेशातील महिला अत्याचार (torture) व कोलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार करीत, अत्यंत निर्दयीपणे खून(Murder) केला आहे. अशा अमानवी घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती(Black ribbons) लावून, न्यायालयाच्या बाहेर घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री ॲड. शरद इंगळे, उपाध्यक्ष मनीषा दिवे पाटील, सचिव प्रदिपसिंह गंगणे, ग्रंथालय सचिव विजय साबळे, सहसचिव तृप्ती इटकरी, कोषाध्यक्ष रोहित सोमवंशी, ज्येष्ठ महिला विधीज्ञ जयश्रीताई पाटील, मेघा पाटणकर, शिल्पा शहादपुरी, स्वाती केंद्रे, गाडेकर, पूनम सूरकुटे, किशोर शिंदे, राहुल गंडले, अजय कल्लशेट्टी, एस. के. जोशी, होमकर, अविनाश सुर्यवंशी, सचिन बावगे, अनिल चुंनगुने, अँड जैनुद्दिन शेख, अँड प्रशांत गायकवाड, संभाजी आर्धे, सचिन कांबळे, भुतडा, राम पाटील, व्ही. एम. कंडारकर आदी विधिज्ञ मोठया संख्येने सहभागी झाले होते.