परभणीच्या पाथरी कडकडीत बंद
– सकल हिंदू समाजाने काढला विराट मुक मोर्चा
– महिलांचाही सहभाग
– आ .राजेश विटेकरांची उपस्थिती
– उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
परभणी/पाथरी (Hindu Morcha) : बांगलादेशातील हिंदू होत असलेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आवाहन केल्यानंतर पाथरी शहरात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला .यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट मूक मोर्चा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे . यावेळी आ.राजेश विटेकर यांचीही उपस्थिती होती.
बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवार १० डिसेंबर रोजी पाथरी बंदचे आवाहन करण्यात आले होते . त्याला प्रतिसाद देत पाथरी शहरातील सर्व बाजारपेठ व प्रतिष्ठाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला .यावेळी अत्यावश्यक सेवा बंद मधुन वगळण्यात आल्याने , दवाखाने , पेट्रोल पंप , बँक व्यवहार चालू होते . दरम्यान सकाळी ११.३० वाजता तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील श्रीराम मंदिर ते उपविभागीय अधिकारी कार्यालय असा विराट मुक मोर्चा काढण्यात आला होता . यावेळी अत्यंत शिस्त व शांततेच्या मार्गाने बांग्लादेशात होत असलेल्या अन्यायाचा विरोध व निषेध नोंदवण्यात आला.
मोर्चात सहभागी हिंदू बांधवांनी निषेधाचे फलक हाती घेतले होते . यावेळी मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या . शहरातील मुख्य रस्ता , सेन्ट्रल नाका मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात दुपारी सव्वा बारा वाजता मोर्चा आला असता याठिकाणी महामंडलेश्वर पद्मनाभ महाराज (ढालेगाव संस्थान ) , महामंडलेश्वर हरिष चैतन्य महाराज , ह .भ.प धनंजय महाराज मोकाशे यांनी उपस्थित हिंदू बांधवांना मार्गदर्शन केले . यावेळी आ .राजेश विटेकर व महामंडलेश्वर यांनी उपविभागीय अधिकारी हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे. दरम्यान पाथरी पोलिसांकडून यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी भारताचे प्रबुद्ध नागरीक म्हणुन बांगलादेशीय अल्पसंख्यांक हिंदूच्या मानवाधिकार , मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करण्याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अलपसंख्याक असलेल्या हिंदूच्या मानवाधिकार , मालमत्तां आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमांमवून निदर्शनास येत असल्याचे म्हणत बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरावर झालेले हल्ले , तोडफोड त्याचबरोबर हिंदू आबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशाप्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणा-या वृत्तींना रोखण्यासाठी पंतप्रधांनानी त्यांच्या स्तरावरून कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे . अशा कार्यवाहीस आम्ही भारताचे हिंदु म्हणुन सोबत ठामपणाने आहोत असेही नमुद केले आहे.
हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिरांचे संरक्षण बांगलादेशात स्थित हिंदू समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांचे आणि मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने कठोर शब्दांमध्ये बांगलादेश सरकारला आपल्या भावना कळवून तात्काळ योग्य ती पावले उचलण्यास आग्रह करावा , हिंदू धर्माचार्यांची सूटका – इस्कॉनचे विन्मय कृष्ण महाराज आणि त्याचे सहकारी तसेच इतर हिंदू धर्माचार्यांची केलेल्या बेकायदेशीर अटकेतून तात्काळ सूटका व्हावी , अशाप्रकारच्या सूचना भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम शासनास कराव्या , हिंदू महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध बांगलादेशात झालेल्या सत्तांतरावेळी आणि त्यानंतर गेल्या कित्येक महिन्यांमध्ये विविध समाजमाध्यमांमधून बांगलादेशातील हिंदू मुलीव महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यांच्या मानवाधिकाराचे हनन समोर आलेले आहे.
सदरील अमानवीय अत्याचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन तात्काळ थांबवण्यासाठी भारत सरकारने जागतिक स्तरावर ह्यासंबंधी आपले मत जाहीरपणाने प्रदर्शित करावे व अंतरराष्ट्रीय समुदायास याबाबत अवगत करावे , बांगलादेशात अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांसोबतच तेथील सामाजिक स्तरावर होत असलेले अल्पसंख्यांक हिंदू समाजाचे धार्मिक उत्पीडन थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत , विविध समाज माध्यमांमध्ये हिंदू धर्म , हिंदू समाज आणि हिंदू संत यांचे होणारे धार्मिक उत्पीडन तात्काळ थांबवण्यात यावे आणि अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या कट्टरता वाद्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यासंबंधी भारत सरकारने जागतिक स्तरावर माडांयची आपले मत जाहीरपणाने प्रदर्शित करावेत , अंतरराष्ट्रीय समुदायास याबाबत अवगत करावे आदी सुचना व मागण्या केल्या आहेत