Nagpur :- कोलकाता येथे आर के जी मेडिकल कॉलेज (medical college) आणि हॉस्पिटल येथे महिला डॉक्टरसोबत झालेल्या क्रूर कृत्यानंतर देशभर या घटनेचे पडसाद उमटलेले दिसले.
नागपूर मशाल मार्च
प्रत्येक शहरात आंदोलन केली जात आहेत. याच शृंखलेत नागपुरातील पार्डी परिसरात शासनाच्या विरोधात मशाल मार्च(torch march) काढण्यात आला. या मार्च च्या माध्यमातून कायदा व्यवस्था बदलणे किंवा मजबूत करणे व नराधमांना फासी (Hang murderers) देणे या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर स्वयंसेवकांकडून मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय, हे आंदोलन मिथिलेश बद्रे, विक्रांत ढोमणे, अमोल सागर, अभिजित बागडे, आदिती दुबे, जान्हवी ढोमणे, तेजस सारंगपुरे, भावेश कुर्जेकर, नचिकेत कुर्जेकर, भूषण बनकर, भूषण लुटे, हर्षल काळे यांच्या पुढाकाराने काढण्यात आला आहे.