Ghatanji :- तालुक्यातील आदिवासी समाजाने २३ सप्टेंबर रोजी शिवाजी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत ‘आदिवासींचा आक्रोश’ मोर्चा काढून राज्य शासनाला ठाम इशारा दिला. मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेल्या या मोर्च्यात आदिवासी नेत्यांनी ठामपणे म्हटले की, ‘बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश ऐतिहासिक व घटनात्मक दृष्ट्या अन्यायकारक आहे.
बंजारा समाजाचा समावेश थांबवा!
नेत्यांनी सांगितले की, १९५० मध्ये संविधानातील अनुच्छेद ३४२ नुसार अनुसूचित जमातींची यादी अधिसूचित करण्यात आली, परंतु त्यामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख नाही. इतिहास संशोधकांच्या अहवालांनुसार बंजारा समाज हा प्रामुख्याने भटक्या व्यापारी व वाहतूकदार समुदाय आहे. १९८१ साली केंद्र शासनानेही (Central Govt) बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या निकषांना पात्र नसल्याचे स्पष्ट केले होते. हैदराबाद गॅझेटचा दाखला देऊन काही आमदारांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी केली. आभार अजय आत्राम यांनी केले.